💥पूर्णेतील जेष्ठ समाजसेवक आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे यांचा संविधान कार्यालयात सत्कार...!


 💥जेष्ट समाजसेवक डॉ.वाघमारे यांना देशाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करावे - प्रकाशदादा कांबळे

पुर्णा/पुर्णेकरांचे आदरस्थान जेष्ठ समाजसेवक तथा आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे यांनी प्रखर न्यायालयीन लढा देऊन शासनाने शाळेसाठी आरक्षीत केलेला भुखंड पुन्हा शाळेसाठी मिळवून दिला सदरील प्रकरणाचा निकाल सन्माननीय दिवानी न्यायालयाने नुकताच याचिकाकर्ते समाजसेवक डॉ.वाघमारे यांच्या बाजूने दिला असून त्यांनी भुखंड माफीयांच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याला सदैव पाठबळ देणारे दलीत चळवळीतील लढवय्ये नेतृत्व तथा रिपाई नेते श्री.प्रकाशदादा कांबळे यांनी नुकताच जेष्ठ समाजसेवक डॉ.वाघमारे यांचा कृतज्ञतापूर्ण सत्कार समारंभ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील संविधान कार्यालयात आयोजित केला होता या सत्कार समारंभा प्रसंगी त्यांनी असे नमूद केले जेष्ठ समाजसेवक तथा तालुक्यातील जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.वाघमारे साहेबांचे आरोग्य तथा सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान असून त्यांच्यासह त्यां
-------------------------------------------------------------
💥जेष्ठ समाजसेवक डॉ.वाघमारे यांना पद्मश्री द्या
संविधान गौरव समितीकडून राष्ट्रपतींकडे मागणी💥

संविधान गौरव समितीच्या वतीने डॉ दत्तात्रय वाघमारे यांचे सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयक सेवा लक्षात घेऊन त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते,या सत्काराप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना सकाळ वृत्तपत्राचे पूर्णेचे प्रतिनिधी जगदीश जोगदंड यांनी हा प्रस्ताव मांडला त्यास सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवून संविधान गौरव समितीत ठराव संमत करण्यात येऊन महामहिम राष्ट्रपतीं यांचे कडे मागणी करण्यात आली..
-------------------------------------------------------------
 मागील अनेक दशकापासून आरोग्य सेवेला समाजसेवा मानून ते व त्याच्या परिवारातील मान्यवर दुःखी जनतेची अहोरात्र सेवा तर करीतच आहे याशिवाय अगदी निस्वार्थपणे समाजसेवेतही त्यांनी आजिवण स्वतःला झोकून दिले आहे.अश्या निस्वार्थी व्यक्तीमत्वाचा आपल्या हातून आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व्हावा या निर्मळ उद्देशानेच आपणा सर्व पुर्णेकरांचे आदर्श डॉ.दत्तात्रय वाघमारे साहेबांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने हीं त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन त्यांना देशाच्या सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी तमाम पुर्णेकरांच्या वतीने संविधान गौरव समितीच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे ही श्री.प्रकाशदादा कांबळे म्हणाले या सत्कार समारंभा प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले,पो.नि.भुमे,नगरसेवक उत्तम खंदारे,ॲड.धम्मा जोंधळे,ॲड. हर्षवर्धन गायकवाड,ॲड.सईद साहेब,रौफ कुरेशी,अशोक कांबळे, विजय जोंधळे,डॉ.गुलाबराव इंगोले,त्र्यंबक कांबळे,सखाराम डोंगरे,शाहीर कांबळे आदीं मान्यवरांसह शहरातील नागरीक यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या