💥पत्रकार सुंदर नाईकवाडे यांची मुलगी स्वरूपा नाईकवाडे झाली पोलीस उपनिरीक्षक...!💥स्वरूपा हि राष्ट्रीय खेळाडु आहे गोळाफेक या क्रीडा प्रकारात रजक पदक मिळवले होते💥

केज (प्रतिनिधी) :-  येथील पत्रकार सुंदर नाईकवाडे व शिक्षिका संगीता यांची कन्या स्वरूपा नाईकवाडे हिने आपल्या परिश्रमाच्या व बुद्धिमत्तेच्या जीवावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे.

        स्वरूपा हि राष्ट्रीय खेळाडु आहे गोळाफेक या क्रीडा प्रकारात रजक पदक मिळवले होते   तिचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील स्वामी विवेकानंद शाळेत पूर्ण केले. तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथून पूर्ण करून शहरातील सरस्वती महाविद्यालयात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.सध्या ती एम.ए. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

        दरम्यान स्वरूपाला खेळाची विशेष आवड असल्याने तिने राज्यस्तरीय सुवर्णपदक व राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळेस पदके मिळवलेली आहे. तर विभागीय व जिल्हास्तरावरही तिने अनेक पदके मिळवलेली आहेत. स्पर्धा परीक्षेची आवड असल्याने तिने सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा परीक्षा देत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने क्रीडा कोट्यातून नववी रँक प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यापुढेही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार असून पोलीस दलातच सेवा करण्याचा मानस स्वरूपा हिने व्यक्त केला. तिच्या या यशाबद्दल  पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या