💥अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी..!💥परभणी जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीने पालम तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे केली मागणी💥

पालम/तालुक्यात दिनांक 18 3 2020 रोजी  सायंकाळी साडे सहा ते सात दरम्‍यान अवकाळी पावसाने पालम तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या गाराने शेतकऱ्यांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन पत्रकार सुरक्षा समिती परभणी यांनी पालम तहसीलदार मार्फत शासनाकडे केली मागणी सध्या शेतकर्याचे शेतामध्ये  ज्वारी हरभरा गहू पीक असून काल दिनांक 18 तीन 2020 रोजी साडेसहा वाजता अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसादराव पोळ यांनी पालम तहसील मार्फत शासनाकडे केली मागणी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या