💥स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना महामारी संदर्भात वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना रोखल्यास कारवाई..!💥माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला गंभीर इशारा💥

यामुळे कर्तव्यावर जाणाऱ्या पत्रकार व डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात अनेक ठिकाणी पोलिसांकडून पत्रकार व डॉक्‍टरांची अडवणूक केली जात असून असे अनेक प्रकार लक्षात आल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी हा इशारा दिला आहे.कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या