💥अन्नदाता शेतकरी हवालदिल,निसर्गाने तोंडचा घास पळवला💥
हातातोंडाशी आलेले पीक वादळी वाऱ्याने पावसामुळे झालेले नुकसान शेतकरी राजा पुन्हा संकटात
पालम: प्रतिनिधी
तालुक्यात आज दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता विजेचा कडकडाटा सह व जोरदार ढग गर्जने सह सहा वाजेच्या दरम्यान अर्धा तास पावसाने हजेरी लावली .सध्या रब्बी पिकाचा मौसम असून हरभरा ,ज्वारी, करडी आधी पिकाचे शेतकऱ्यांची शेतामध्ये काम चालू असून या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना मदत द्यावी असे शेतकरी वर्गातून जोरदार मागणी होत आहे. शासनाकडून शेतकऱ्याला लवकर मदत मिळेल का ,अशी सर्व शेतकरी वर्गातून मागणी जोर धरत आहे . शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामात कापणीला आलेला गहू ज्वारी हरभरा आदी पिके शेतकऱ्यांचे शेतामध्ये असून शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असून ह्या अचानक आलेल्या पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र परिसरात दिसून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी सर्व मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे...
0 टिप्पण्या