💥परभणी जिल्ह्यात कोरोना विरोधात लढण्यासाठी खा.संजय जाधव यांचा एक कोटीचा निधी....!💥 जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे आपल्या खासदार फंडातून निधी देण्याचे पत्र सुपूर्त💥 

💥जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्‍याचे आवाहन💥 

परभणी/  कोरोना या व्हायरस मुळे जग हादरले आहे जिल्ह्यात जिल्ह्यातही कोरोना चे संशयित रुग्ण वाढत असल्याने याविरोधात जिल्हा प्रशासनाला बळ देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी एक कोटीचा निधी दिला आहे जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे निधीचे पत्र सुपूर्त केले आहे
मागील 22 तारखेपासून परभणी जिल्हा व संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्याच्या बॉर्डर सुद्धा सील केल्या आहेत कोरोना व्हायरस ची दहशत घराघरात पसरली आहे परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळत नसला तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे जिल्हा प्रशासन कोणाच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करत आहे

  • अनेक सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत अशावेळी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना एक कोटीचा निधी दिला आहे तसेच खासदार जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोरोना पासून बचावाची काळजी घ्यावी असे भावनिक आवाहन केली आहे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या सूचना नागरिकांनी पाळाव्यात असेही खा जाधव यांनी सांगितले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या