💥मुंबई,ठाण्यातील नागरिकांना ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र मिळणार नाहीत..!


💥बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राचे वितरण व विक्री थांबवण्याचा निर्णय💥

मुंबई- बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राचे वितरण आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ही बंदी असणार आहे. वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते, डेपोधारक, वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी, वृत्तपत्र टाकणारी मुले ही सर्व सहभागी असतात. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाजास्तव वितरण थांबवण्यात येत आहे,  त्यामुळे मुंबई, ठाण्यातील नागरिकांना ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र मिळणार नाहीत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या