💥जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे पडले महागात💥
परभणी/राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार हालचाली चालत असतांना व देशासह राज्यात सर्वत्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा - २००५ लागू असतांना आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केल्यानंतर सर्वत्र बंद असतांना शहरातील अशोकरोड परिसरातील सौदागर वॉटर फिल्टरचे बाजूस मटन विक्रीची दुकान चालवणाऱ्या मोहंम्मद परवेज मोहंम्मद सलीम या मटन विक्रेत्याने मटन विक्रीच्या उद्देशाने दुकान उघडे ठेवून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अवज्ञा करीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी यांचे आदेशाचे पालन नकरता तसेच देशासह राज्यात कोरोना (कोवीड-१९) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता दुकान उघडले म्हणून फिर्यादी पोहेकाँ.नितीन सुधाकर वडकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी मोहंम्मद परवेज मोहंम्मद सलीम याच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात गुरनं.१३०/२०२० कलम १८८ भादवी व कलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
0 टिप्पण्या