💥विभागीय आयुक्तांनी दिले सक्तीचे आदेश,परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य...!💥संपूर्ण माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालय किंवा महानगर पालिकेला देणे बंधनकारक💥  

औरंगाबाद, (विमाका) दि. 26 :-
 जे नागरिक 1 मार्च 2020 नंतर परदेशातून आले आहेत, त्यांनी आपल्याबद्दलची  संपूर्ण माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
   तसेच जीवनावश्यक वस्तुंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन आपल्या बद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी. तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकानेही उघडी राहतील, त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. सामानाची मोठया प्रमाणात साठवणूक करू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे...
-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या