💥सचखंड गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांनी बचावाच्या दिशेने उचलले पाऊल💥
नांदेड/येथील सिख धर्मियांचे पवित्रस्थान तखत सचखंड श्री हुजूर साहीब गुरुद्वारा येथे होळी सनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या 'हल्ला बोल' या धार्मिक कार्यक्रमासाठी प्रतिवर्षी देश-विदेशातून हजारोच्या संख्येने तिर्थयात्री येत असतात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी उद्या दि.९ मार्च रोजी होळी व १० मार्च २०२० रोजी धुळीवंदन असल्यामुळे या दोन्ही दिवसी तखत सचखंड गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह 'हल्ला बोल' हा पारंपारिक धार्मिक उत्सव साजरा केला जातो.त्यामुळे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नांदेड येथे तिर्थयात्री येत असतात
त्यामुळे देश-विदेशातून येणारे तिर्थयात्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या यात्री निवासस्थानांमध्ये निवासस्थानांची बुकींग करुन राहतात सद्या चायना येथून संपूर्ण जगभरात फैलावत असलेल्या 'कोरोना व्हायरसने' संपूर्ण जगात दहशत निर्माण केली असून या भयंकर जिवघेण्या व्हायरसची नांदेड जिल्ह्यातही प्रचंड दहशत असून या जिवघेण्या 'कोरोना व्हायरस' पासून स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या तिर्थयात्री निवास स्थानांतील कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून कर्मचाऱ्यांनी तोंडावर मास्क लावण्यास सुरुवात केली आहे.होळी सनाच्या देश-विदेशातून येणाऱ्या तिर्थयात्रेकरुच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या यात्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे..
0 टिप्पण्या