💥घाबरू नका...गांभीर्य बाळगा..प्रशासनाला सहकार्य करा....!💥 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फुलचंद भगत जिल्हावासियांना आवाहन💥

मंगरुळपीर :- प्रशासन व आरोग्य विभागाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो.नागरीकांनी भीती बाळगू नये,अकारण प्रवास टाळावा व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी जिल्हावाशीयांना केले आहे.
               संपुर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शासकीय निम शासकीय तसेच खासगी संस्था,विभागांना ३१ मार्च पर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य अपेक्षित असून नागरीकांनी प्रशासकीय निर्देशांचे पालन करून यंत्रणेला सहकार्य करावे यासाठी फुलचंद भगत यांनी नागरीकांना आवाहन केल आहे.भगत यांनी आवाहन करताना म्हटले आहे की नागरीकांनी अकारण प्रवास करू नये,गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे व सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळे शक्यतो रद्द करावेत.बाहेर वावरताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत,हात स्वच्छ असल्याशिवाय कान, नाक,डोळे,यांना स्पर्श करू नये,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा.तसेच लहान मूल,वयोवृद्ध व गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्यात यावी.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी सद्यस्थितीत आहेत त्याठिकाणीच थांबावे असे आवाहन करताना प्रशासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल असा विश्वास देखील फुलचंद भगत यांनी व्यक्त केला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या