💥पुर्णेत शासकीय आदेशाची अवज्ञा,कोरोना विषाणुचा संसर्ग पसरवण्याच्या दृष्टीने फिरणाऱ्यावर गुन्हा दाखल...!



💥कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असतांनाही बिनकामी तोंडावर मास्क न लावता बुलटवर फिरणे आले अंगलट💥

पुर्णा/शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेत असतांना ही काही लोक प्रशासनाचे निर्देश न पाळता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवज्ञा करीत कोरोना विषाणुचा संसर्ग पसरवण्याच्या दृष्टीने हयगयीने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे अशीच एक घटना काल २९ मार्च २०२० रोजी सायं.०६-३० वाजेच्या सुमारास घडली असून नितीन विश्वनाथ कांबळे नामक इसम ॲटो चालक इसम रॉयल इंन्फेल्ड क्र.एम एच २२ ए.ई ५००० यावर बसुन तोंडाला मास्क न लावता शहरातील सौदागर वॉटर फिल्टर चे बाजुला तडीपार मैदान समोर सार्वजनिक रोडवर विनाकारण फिरत असल्याचे पोलीस पथकाला निदर्शनास आले.
यावेळी त्यास पोलीस पथकाने शहरात फिरण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही अत्यावश्यक काम नसल्याचे सांगितले त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून फिर्यादी पोहेकॉ.नितीन सुधाकरराव वडकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नितीन कांबळे रा.सिध्दार्थ नगर पुर्णा याच्या विरोधात कोरोना विषाणुचा संसर्ग पसरवण्याच्या दृष्टीने हयगयीने शहरात संचारबंदी लागू असतांना विनाकारण फिरल्या प्रकरणी व मा.जिल्दाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेब परभणी यांचे आदेशाची अवज्ञा केली म्हणून भादवि कलम २६९,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या