💥सोशल मीडियात कोरोना विषयी चुकीची माहिती देऊन अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान..?


💥अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात प्रशासन करणार कडक कायदेशीर कारवाई💥

मुंबई : कारोना वायरसच्या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फेत मुंबई शहर व उपनगरामध्ये आरोग्य व्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक तेवढ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु काही व्यक्ति चुकीची माहिती, चुकीचे संदेश, चुकीचे सूचना, चुकीची परिपत्रके whats app, facebook, twitter, इत्यादीच्या माध्यामातून नागरिकांमध्ये पसरविली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
आपणास विनंती करण्यात येत आहे की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 205 कलम 54 अंतर्गत सामाजिक प्रसारमाध्यमाच्या साहाय्याने कारोना व्हायरसच्या विषयी चुकीची माहिती पसरविण्यात येणार्या व्यक्ति विरोधात कडक कारवाई करावी असे निर्देश संबधित अधिकार्यांना द्यावेत अश्या माहितीचे पत्रक प्रविण परदेशी यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या