💥 कोलंबीचा 'तो' रुग्ण कोरोना निगेटिव्ह....!



💥नायगाव तालुक्यात कुणीही कोरोना पॉझिटीव्ह नाही💥

कोलंबीचा तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह असून सध्या नायगाव तालुक्यात कुणीही कोरोना पॉझिटीव्ह नाही. कृपया उत्साही कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सोशल मीडिया कोणत्याही पोस्ट टाकताना खात्री असेल तरच टाका अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन नायगाव तालुका आरोग्य अधिकारी शेख बालन आणि नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, कोलंबी (ता. नायगांव, जि. नांदेड) येथील तरुण पुणे येथे कामावर होता. कोरोनाची लागण झाल्याने कंपनी बंद झाल्याने तो गावाकडे आला. यानंतर त्याला सर्दी, खोकला झाला. गावातील प्रतिष्ठीत लोकांनी नायगाव ग्रामीण रुग्णालयात त्याला नेले. तेथून त्याला नांदेड येथे नेण्यात आले. त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत रुग्णालयात ॲडमिट केले. दुसऱ्या दिवशी त्या तरुणाने रुग्णालयातून पलायन केले. सर्वत्र शोधाशोध केली तो सापडला नाही. पण आज त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासन आणि गावकरी यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शेख म्हणाले, नायगाव तालुक्यात प्रत्येक गावात बाहेरून आलेला व्यक्ती हा कोरोनाचा रुग्ण नाही आणि ही माहिती प्रशासनाकडे असावी म्हणून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला. या व्यक्तीची रोज नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत फोनद्वारे तब्येतीची चौकशी केली जात आहे. वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी, वैद्यकीयशास्त्र आणि मार्गदर्शक सूचनेनुसार जर तो कोरोना संशयित वाटल्यास गावातून रूग्णवाहिकेतून त्याला पुढील तपासणीसाठी नेण्यात येईल.
खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन म्हणजे १४ दिवस घरी थांबायण्यास सांगण्यात येते. त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. कुणीही घराबाहेर अत्यावश्यक गोष्टी व्यतिरिक्त बाहेर निघू नये,एकत्र येऊ नये, अधिक माहिती यासाठी गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी यांना फोनवरून संपर्क करावा, ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील. शिवाय वातावरण बदलामुळे झालेली सर्दी, खोकला, ताप म्हणजेच कोरोना नाही, असे शेख बालन यांनी जनतेला उद्देशून सांगितले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या