💥नांदेड येथे "संचारबंदीतील लॉयन्सचा डबा" खानावळ बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरपोच डबा...!


💥लॉयन्स क्लब सदस्यांकडून विद्यार्थ्यांना 240 डब्यांचे वितरणा,प्रोजेक्ट चेयरमन ॲड.ठाकूर यांनी दिली माहिती💥

 नांदेड, प्रतिनिधी

लॉयन्स क्लब नांदेड सफायर चे अध्यक्ष लॉ. आनंद   चिमकोंडवार, सचिव लॉ.डॉ. अश्विन लव्हेकर, कोषाध्यक्ष संदीप अग्रवाल  यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार डबे वितरीत करण्याचा संकल्प केला आहे . लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल  आयोजित  "संचारबंदीतील लॉयन्सचा डबा" या उपक्रमात शनिवार दि.28 जुन रोजी
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या  सुचनेनुसार नागिनघाट परिसरातील अपंग व गतिमंद निराधाराना लॉ.अद्वैत उंबरकर व लॉ.रविंद्र औंढेकर, दिलीप ठाकूर यांनी शंभर  डबे वितरण केले.स्वयंसेवक मन्मथ स्वामी व राजेशसिंह ठाकूर यांनी एकशे आठ
विद्यार्थाना,तेरा
ट्रेनि डॉक्टर व नर्स, दहा  शिकाऊ पोलीस या सर्वांना घरपोच डबे दिले.या शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयातील  बावीस  पोलीस कर्मचारी आणि सात सफाई कामगारांना डब्याचा पुरवठा करण्यात आला.आता पर्यन्त पाचशे  डबे वितरीत करण्यात आले असून
आचारसंहिता संपेपर्यंत दररोज लॉयन्सचा डबा वितरीत करण्यात येणार असल्यामुळे डबे देणाऱ्या अन्नदात्यांनी आणि डब्याची आवश्यकता असलेल्या  विद्यार्थ्यांनी व  इतर गरजवंतांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या सदस्यांनी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष डॉ. विजय भारतीया,  प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या