💥महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधू भगीनीं चा एक दिवसाचा पगार कपात करा...!💥महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र💥

 महोदय,
सध्या महाराष्ट्रात कोरोना वायरस ने थैमान घातले आहे. अशी भयावह स्थिती सबंध देशभरात आहे. आपण या अचानक ओढवलेल्या या परिसरातील मोठ्या तयारीने मात करित आहात त्याबद्दल मुंखमंत्री म्हणून आपले व सर्व संबधीत मंत्री महोदय व यंत्रणा सुंदर कार्य करित आहात त्याबद्दल आपले व सर्व यंत्रणेचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.. आणि पुढील बचाव कार्यास महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगीनीं कडून शुभकामना.. हे सर्व उपाययोजना करित असताना आपली राज्याची अर्थीक परिस्थिति ही नाजूक असताना आपण कशाचीही चिंता न करता हे समोरील "कोरोना" वायरस युद्ध जिंकण्यासाठी खंबीर पावले उचलत आहात.*
   *आपल्या या देश कार्यात राज्यातील आम्हा शिक्षक बंधू भगीणींचाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही आमच्या पगारातून एक दिवसाचा पगार कपात करावा असे आम्ही या नाजूक परिस्थितित स्वइच्छेने जाहीर करित आहोत.. तत्काळ आपल्या शासकीय यंत्रणेस शिक्षण विभागास हा एक दिवसाचा पगार कपात करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती*
  *आपले नम्र*
*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती*

हा मेसेज माधव लातुरे राज्यसचिव महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समीती यांनी वाटसपवर शेअर केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या