💥बळीराजा साखर कारखान्याचे महाप्रबंधक अशोक थोरात व संचालक दिनकर जाधव यांनी दिली भेट💥
कोरोनामुळे २१ दिवसांचा अचानक लोकडाऊन केल्याने गेल्या आठ दिवसापासून रोजमजुरीची सर्व कामे ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने पूर्णेतील अनेक दानशूर हे पुढाकार घेत "हात मदतीचा" या शीर्षाखाली गरजवंतांना धान्य वाटप करण्यास सुरुवात केले असून आज दि.३० मार्च रोजी
पूर्णेतील बळीराजा साखर कारखान्याचे महाप्रबंधक श्री अशोक थोरात व संचालक दिनकर जाधव उर्फ अप्पाराव यांनी नियोजन स्थळी सुमन मंगल कार्यालय येथे भेट दिली. त्यांनीही कारखान्याच्या वतीने "हात मदतीचा" या ग्रूपा मार्फत पाच कुंटल साखर देत यापुढेही प्रत्येक गरजवंताला मदत करण्याचे आश्वासन दिल.
तरी "हात मदतीचा" या ग्रूपच्या सर्व सदस्यांच्या वतीने बळीराजा साखर कारखान्याचे आभार व्यक्त करण्यात आले.
0 टिप्पण्या