💥पुर्णा रेल्वे स्थानकात रेल्वेने दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी 'सॅनिटायझरची हॅन्डवाॅशची' व्यवस्था...!


💥रेल्वे कडुन स्क्रीनिंग,स्थानिक व रेल्वे प्रशासन लागले कामाला💥

पुर्णा/देश,विदेशासह,महानगरातून रेल्वेने प्रवास करून पुर्णा शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी येथिल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर 'सॅनिटायझरची हॅन्डवाॅशची'व्यवस्था जनजागृती तसेच रेल्वे प्रशासनाकडून स्क्रीनिंगटेस्ट शुक्रवारी दि.२० रोजी  करण्यात आली.

       कोरोना' विषाणूच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आमलात आणल्या जात आहेत.सध्या राज्यशासनाने शाळा महाविद्यालय, कंपन्या,सरकारी कार्यालयाला सुट्टी जाहीर केल्याने पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आदीं महानगरातून आपल्या गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.यावर उपाय योजना म्हणून तहसिल प्रशासनाने खबरदारीचा उपाय घेत, येथिल रेल्वे स्थानकावर परभणी जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार जनजागृती करत 'सॅनिटायझरची हॅन्डवाॅशची' व्यवस्था सुरू केली आहे.तर रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्क्रीनिंग टेस्ट घेत प्रवाशांची ताप मोजण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी शुक्रवारी २० रोजी केले. येथिल रेल्वे स्थानकावर लागणारा संपूर्ण 'सॅनिटायझर हॅन्डवाॅशची' पुरवठा करणाऱ्या पुर्णा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे आभार मानले. तर अधीक गरज अधीक गरज भासल्यास रेल्वे प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे रेल्वे प्रशासनाने यावेळी जाहीर केले. या कामी संपुर्ण आरोग्य विभाग रेल्वे प्रशासनाचे, कर्मचारी सहकार्य करणार असल्याचे तहसिलदार टेमकर यांनी सांगितले.यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर महेंद्र निकाळजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ हरिभाऊ गाडेकर,स्टेट बँकेचे व्यवस्थापक राम ठाकूर ,सचिन भायेकर, चंद्रकांत काकडे, उपेंद्र करवंदे, फारुकी, रेल्वे विभागाचे डॉ.सुजी, संतोष जीना, कमलेश मीना,ग्यान प्रकाश गुप्ता,प्रविण कुमार, गौतम श्रीपठ यांच्या पथकाने प्रवाशांना कोरोना व्हायरस बाबत जनजागृती केली. रेल्वे स्थानकावर  उतरणा-या  प्रवाशांनी आपले हात साफ करून शहरात प्रवेश करावा,शक्यतो मास्क,हात रुमाल वापरावा असे आवाहन ही टेमकर यांनी केले. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतेची पहाणी तसेस रेल्वे स्टेशन मास्तर महेंद्र निकाळजे यांच्या कडून आढावा घेतला व कोरोना व्हायरस बाबत योग्य ती खबरदारी घेत जनजागृती तसेच सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या