💥राज्यातील पिंपरी चिंचवडमध्ये २४ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग...!💥राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे💥


मुंबई/महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी एक दिलासा देणारी,तर दुसरी चिंता वाढवणारी बातमी आहे. करोनाबाधित रुग्णांपैकी पाच जणांची प्रकृती बरी झाली आहे. त्यांना लवकरच सुटी देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणखी तीन नवे रुग्ण सापडल्याचंही ते म्हणाले. यात पिंपरी चिंचवडमधील एका २४ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
राज्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोना बाधित रुग्णांचा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचा संसर्ग झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्याबरोबर मुंबईतही एकाला लागण झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एका २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात करोना बधितांचा आकडा हा १२ वर पोहोचला आहे. तर पुण्यात आणखी रुग्ण सापडल्यानं पुण्यातील आकडाही दहावर गेला आहे. या दोन्ही रुग्णांना क्वारेंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या