💥मंगरुळपीर येथील किराणा दुकान जळुन खाक,अंदाजे सात लाखाचे नुकसान....!


💥आगीची माहीती कळताच अग्निशमन दलाला प्राचारण करन्यात आले💥

वाशिम-(फुलचंद भगत) मंगरुळपीर शहरालगतच असलेल्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिंदेनगर येथे असलेल्या रामचंद्र विष्णुदास परळीकर यांच्या किराणा दुकानाला दि.२५ मार्चच्या राञी बाराच्या सुमारास आग लागली असुन या आगिमध्ये किराणामालासह सर्व वस्तु जळुन खाक झाल्या आहेत.
ड्रावरमधील मालाचे आलेले पैसेही जळले असुन या आगीमध्ये अंदाजे सात लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.आगीची माहीती कळताच अग्निशमन दलाला प्राचारण करन्यात आले आणी आग विझविन्यात आली.तसेच पोलिसानीही घटनास्थळी धाव घेतली.सरपंच,तलाठी यांनीही घटनास्थळी जावुन पंचनामा केला आहे.ही आग शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचे समजते.पुढील तपास पोलिस करीत आहेत.या आगीत झालेल्या नुकसानीमुळे आर्थीक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी इश्वरी प्रोव्हिजनचे मालक रामचंद्र परळीकर यांनी केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या