💥कोरोना फैसावाच्या भितीमुळे मुळे ३६ देशांतील प्रवाशांना भारतात येण्यास तात्पुरती प्रवेशबंदी...!



💥भारतात ११ देशांतून येणाऱ्या प्रवाशांना एकांतवास बंधनकारक💥

कोरोना साथीच्या फैलावामुळे ३६ देशांतील नागरिकांना भारताने तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. तर ११ देशांमधून भारतात येणा-या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहाणे बंधनकारक आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. ज्या ३६ देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे त्यामध्ये आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपिब्लक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलंड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिटेनस्टिन, लिथुआनिया, लक्झेमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्कस्थान, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांसाठी लागू केलेली प्रवेशबंदी १२ मार्चपासून तर फिलिपिन्स, मलेशिया, अफगाणिस्तानच्या प्रवाशांसाठीची प्रवेशबंदी १७ मार्चपासून अंमलात आली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान, कुवैत, चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स येथून परतणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. दक्षिण कोरिया, इटली येथून परतणार्या प्रवाशांनी कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र स्वत:सोबत आणणे बंधनकारक आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतून भारतामध्ये येत्या दोन आठवड्यांच्या काळात २६ हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये बहुतांश भारतीय नागरिक असणार आहेत. या हजारो लोकांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यापासून अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आता तयारी सुरू केली आहे.
संयुक्त अरब अमिरती, कुवेत, कतार, ओमानसारख्या आखाती देशांतून दररोज वीस प्रवासी विमाने मुंबई विमानतळावर येत असतात. तेथून मग हे प्रवासी आपापल्या मुक्कामी जातात.
या देशांतून येणार्या सर्व प्रवाशांना १४ दिवस सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा या प्रवाशांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणार्यांपैकी बहुतांश लोक हे कुशल कामगार आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या