💥पुर्णा पोलीस स्थानकातील कर्मचारी नितीन वडकर यांच्या कर्तृत्वाला सलाम...!



💥समाजहीताची प्रथमतः जान,कर्तव्याचेही भान आणी यातून पुन्हा रक्तदान💥

पुर्णा/कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नए याकरिता शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संचारबंदीची घोषणा केली या संचारबदी काळात कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासह नागरिकांना या भयंकर विषाणूंपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जिव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतांना आपल्या एका मित्राचा रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याचा फोन आल्यानंतर समाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या पुर्णा पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन वडकर यांनी तात्काळ त्या मित्राला यावेळी रक्तदान करणारी व्यक्ती कोण मिळेल असा प्रश्न उपस्थित करुन क्षणाचाही विलंब न करता स्वतःच परभणी येथील पंकज खेडकर यांच्या रक्तपेढीत जावून स्वतः रक्तदान करीत रक्तदान श्रेष्ठ दान असल्याचा प्रत्यय श्री.वडकर यांनी आणून दिला.'समाजहीताची प्रथमतः जान,कर्तव्याचेही भान आणी यातून पुन्हा रक्तदान' पोलीस कर्मचारी नितीन वडकर यांच्या कर्तृत्वाला खरोखरच आज आमचा शतशः सलाम....शतशः सलाम..शतशः सलाम....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या