💥मुंबई पुण्यावरून परत आलेल्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना...!💥परभणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना💥 

१) घरी आल्यानंतर सर्वात प्रथम गरम पाण्याने साबणाने स्वच्छ आंघोळ करा .
घरात इकडे तिकडे आंघोळीपूर्वी स्पर्श करू नका .
२) कपडे बूट व ज्या वस्तू पाण्याने धुता येत असेल त्या लगेच स्वच्छ गरम पाण्याने व साबणाने धुुऊन काढा .
३) मोबाइल व इतर वस्तूं   स्पिरिट  व सॅनिटायझर नी पुसून काढा .
४) सुट्टीवर आला आहात तर घरीच थांबा इकडे तिकडे फिरु नका .
५) दिवसातून दोन वेळेस गरम पाण्याच्या गुळण्या करा .स्वच्छता बाळगा .
६) घरचेच जेवण घ्या .
७) व्हिटॅमिन सी साठी लिंबू संत्र मोसंबी यासारखे फळे  घ्या
८) mask/ स्वच्छ रुमाल वापरा
९) ८ तासांची शांत झोप घ्या .
१०) वरील सर्व गोष्टी या कमीत कमी पंधरा दिवसांसाठी पाळावयाच्या आहेत .
११)सर्दी खोकला ताप इतर काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा संपर्क साधावा व त्यांना बाहेर गावावरून  आल्याची कल्पना द्यावी.
   लक्षात घ्या आपल्या या खबरदारीने आपण कोरोना आजाराचा प्रसार आपल्या गावामध्ये थांबवू शकतो .
     जनहितार्थ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या