💥आयबी कर्मचारी अंकित शर्माच्या हत्या प्रकरणात फरार आपचा नगरसेवक ताहिर हुसैनला अटक..!


💥हुसैनची आत्मसमर्पणाची याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली💥

दिल्ली न्यायालयाने गुरुवारी आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनची आत्मसमर्पणाची याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करणाऱ्या अंकित शर्माच्या हत्या प्रकरणात ताहिर हुसैन आरोपी आहे. ताहिर हुसैनने दिलासा देण्याची मागणी केली होती. पण ते न्यायालयाच्या अवाक्याबाहेर आहे असे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल पाहुजा यांनी हुसैनची याचिका फेटाळून लावली.
न्यायालायने ताहिर हुसैनची याचिका फेटाळल्यानंतर आधीपासून तिथे हजर असलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने लगेच त्याला अटक केली. तपासामध्ये सहकार्य करायचे असून, त्यासाठी आपल्याला आत्मसमर्पण करायचे आहे असे त्याने याचिकेत म्हटले होते. हुसैनच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याला आत्मसमर्पण याचिका दाखल करावी लागली असा युक्तीवाद त्याचे वकिल  मुकेश कालिया यांनी कोर्टासमोर केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या