💥मुंबईत येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा...!



💥राणा कपूर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे💥

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील घरावर शुक्रवारी रात्री ईडीनं छापे टाकले. याव्यतिरिक्त राणा कपूर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्जे थकीत झाली. त्यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. दोन दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लादले होते. तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील पुढील ३० दिवसांमध्ये येस बँकेची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
शुक्रवारी रात्री सक्तवसुली संचलनालयानं राणा कपूर यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. यावेळी ईडीनं काही कागदपत्रांचीही पडताळणी केली. याव्यतिरिक्त राणा कपूर यांना लूकआऊट नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना आता देशाबाहेर जाता येणार नाही. गुरूवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले होते. तसंच खातेदारांना त्यांच्या खात्यातून ५० हजारांची रक्कम काढता येणार असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर राणा कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या