💥पुर्णेत 'स्वच्छ शहर,सुंदर शहर'अभियानाची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात..!


💥स्वच्छता रक्षक अर्थात स्वच्छता कर्मचारीच असुरक्षीत तिथे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय ?💥  

पुर्णा/नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागात कार्यरत असंख्य स्वच्छता रक्षकांचे अर्थात सफाई कामगारांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत असून शहराच्या स्वच्छतेसाठी काबाडकष्ट करणारे कायमस्वरुपी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या स्वच्छता रक्षकांच्या आरोग्याशी पुर्णा नगर परिषद प्रशासना कडून खेळ खेळल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून संपूर्ण जग मागील काळात प्लेग,मलेरीया,डेंगू,चिकन गुनीया,इबोला व्हायरस,स्वाईन फ्ल्यू,आदी जिवघेण्या आजारांसह सद्य परिस्थितीत कोरोना व्हायरस व मंकी फ्ल्यू या भयंकर आजारांच्या दहशतीखाली वावरत असतांना व प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सावध करण्याच्या दृष्टीने कोट्यावधी रुपयांचा खर्च प्रचार साहित्य तसेच जाहिरातींवर करुन सतर्कतेचा इशारा दिला जात असतांना मात्र पुर्णा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी उमेश डाफने हे स्वच्छता विभागात स्वच्छता रक्षकांची यशस्वी भुमिका पार पाडणाऱ्या ४० कायमस्वरुपी कर्मचारी ज्यात १४ महिला कर्मचाऱ्यांचा तर २६ पुरूष कर्मचाऱ्यांचा समावेश तर ३० रोजंदारी कर्मचारी तसेच गुत्तेदारी पध्दतीने काम करणाऱ्या ४० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह भविष्याशी अक्षरशः खेळ खेळत असल्याचे निदर्शनास येत असून संपूर्ण शहरातील स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्य सुरक्षेसाठी नगर परिषद प्रशासन हँन्डक्लोज,मास्क,शुज,हेल्मेट,सुरक्षा कवच (युनीफाम) डेटॉल,साबन आदींसह शहरातील स्वच्छतेसाठी लागणारे झाडू फावडे टोपले सुध्दा मागील तब्बल सात वर्षापासून पुरवत नसल्याने निदर्शनास येत आहे.शहरातील नाल्या साफ करतांना तसेच कचरा तसेच मृत जनावरे उचलतांना लागणारे साहित्यही कर्मचाऱ्यांना नगर परिषद प्रशासन उपलब्ध करुन देत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या स्वच्छता विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना मागील चार महिण्यापासून वेतन सुध्दा देण्यात आलेले नाही तर ऐरीयसचा एकही हप्ता या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नसून शासनाकडून सन उत्सवा वेळी देण्यात येणारा दहा हजार रुपयें फेस्टीव्हल ॲडव्हांस या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयें देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचे समोर आले आहे.
पुर्णा नगर परिषदेतील आरोग्य व स्वच्छता विभागात कार्यरत शहरातील  स्वच्छतेची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडून जनसामान्यांचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या या स्वच्छता रक्षकांचेच आरोग्य नगर परिषद प्रशासनाने धोक्यात आणल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत असून परभणीचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन पुर्णा नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कार्यरत या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावल उचलावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे...
-----------------------------------------------------------
नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.गंगाबाई एकलारे व आरोग्य व स्वच्छता विभागाचे नुतन सभापती ॲड.हर्षवर्धन गायकवाड हे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे लक्ष देतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहराच्या स्वच्छतेची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या स्वच्छता रक्षकांना कोरोना व्हायरससह अन्य गंभीर आजारांपासून वाचवण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना हँन्डक्लोज,मास्क,शुज,हेल्मेट,सुरक्षा कवच (युनीफाम) डेटॉल,साबन आदी साहित्य तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी समोर येत आहे..
***********

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या