💥पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातील भुकेल्या गोरगरीबांना अन्नदात्या मुस्लीम बांधवांनी केले अन्नदान...!💥संचारबंदी मुळे अनेक गोरगरीब रोजमजूरांवर उपासमारीची वेळ प्रशासनाचे दुर्लक्ष💥

पुर्णा/संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नए याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवार दि.२४ मार्च २०२० रोजी रात्री १२-०० वाजेपासून २१ दिवसासाठी लॉकडाऊन (संचारबंदी) केल्याची घोषणा केली या संचारबंदी मुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव निश्चितच थांबेल परंतु या संचारबंदीचा सर्वात मोठा फटका रेल्वे स्थानक बसस्थानक परिसरात राहून रस्त्यावर भिक मागून जिवण जगणाऱ्या गोरगरीब भिकारी तसेच वाड्या वस्त्यामध्ये,झोपडपट्यामध्ये राहणारे गोरगरीब रोजंदारी कामगार यांना बसत असून या गोरगरीबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे भयावह चित्र निर्माण झाले असून
अश्याच भयंकर परिस्थितीला तोंड देणाऱ्या गोरगरीब व भिक मागून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील मुस्लीम समाजातील शेख नदीम,मोहसीन शेख,शादाब पठाण,शेख जुबेर,रौफ कुरेशी,खदीर सर या अन्नदात्यांनी मानुसकीची भावना जोपासत या गोरगरीबांसाठी अक्षरशः इश्वराचे दुत बनून अन्नदानास सुरुवात केल्याने त्यांच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या