💥नागरिकांनी शासकीय कार्यालयास भेट देणे टाळावे - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर  • 💥परभणी जिल्हा विशेष वृत्तांत💥परभणी, दि. 18:- केंद्र शासनाच्या  सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मर्यादित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात यापुढे केवळ मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येणार आहे.  तरी अत्यंत तातडीच्या कामाशिवाय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयास भेट देणे  टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक लिपिक व एका शिपायाची कार्यालयीन वेळेमध्ये नेमणूक करण्यात आली असून त्या ठिकाणी एका इंटरकॉम फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना ज्या अधिकाऱ्याला भेटावयाचे असेल त्या अधिकाऱ्याला इंटरकॉमवर फोन करून आधी सदर अभ्यागताबद्दल कळविण्यात येईल. त्यानंतर अभ्यागताचे कामाचे स्वरूप लक्षात घेऊन संबंधित अधिकारी अभ्यागतांची भेट घेण्याबद्दल उचित निर्णय घेतील. तसेच प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली असून भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी  सॅनिटायझरची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे...

-*-*-*-*

💥कोरोना विषाणूला प्रतिबंध म्हणून  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे पुढे ढकलली..!  

     
       परभणी, दि. 18 :-   कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी उपाययोजना म्हणून परभणी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्तीची तारीख 31 मार्च 2020 पुर्वीची असल्यास ती रिशेड्युल करुन पुढील महिन्यात घ्यावी तर शिकाऊ अनुज्ञप्ती  31 मार्च पुर्वी संपणारी असेल केवळ अशाच अर्जदारांसाठी पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी सुरु राहणार आहे. कार्यालयात अनुज्ञप्ती नुतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, वाहन परवाना विषयक कामे, नवीन वाहन नोंदणी विषयक कामे करण्यात येणार आहेत. तर वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढवणे-उतरवणे, ना-हरकत जारी करणे आदी विषयक कामकाज दि.31 मार्चनंतर करण्यात येतील. तरी संबंधितांनी सहकार्य करावे व कार्यालयाच्या परिसरात गर्दी करु नये, कोरोनापासून बचाव हाच एकमेव उपाय आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आह                     

 💥नागरिकांना कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी आवाहन...!   

       

       परभणी, दि. 18 :- परभणी तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व तालुकास्तरावरील शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी अत्यंत निकडीच्या व अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी जाणे टाळावे तसेच अत्यावश्यक काम असल्यास tahsildarparbhani@gmail.com या मेलद्वारे किंवा दुरध्वनी क्र.02452-222711 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, प्रवास व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे तहसीलदार, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-
                                     

💥 शासकीय व खाजगी शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जारी...!    

       

       परभणी, दि. 18 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा, तसेच महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, सर्व खाजगी शालेय आणि महाविद्यालयीन शिकवणी वर्ग, सर्व खाजगी निवासी वसतिगृह, सर्व अंगणवाड्या, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच सर्व प्रशिक्षण केंद्र हे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनूसार जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी प्राप्त अधिकारानुसार दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानूसार घेण्यात येवून आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित संस्था प्रमुखाची राहील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-
                   💥जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी...!

   

      परभणी, दि.18 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 मार्च 2020  रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 31 मार्च 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.   

या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

💥जिल्ह्यातील विविध कार्यक्रम स्थगीतीबाबत आदेश जारी..!   

     
परभणी, दि. 18 :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये तसेच जीवित हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व परिसंवाद, परिषदा, कार्यशाळा आदि सर्व कार्यक्रमाचे आयोजनास ज्यात मोठ्या प्रमाणात व्यक्ती एकत्र येतात असे कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगीतीबाबत आदेश जारी केले आहेत.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या