💥पुर्णेत हात मदतीचा...देत गोरगरिबांसाठी धान्य घरपोच देण्याचे नियोजन..!



💥कोरोनामुळे रोजगार नसल्याने अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ💥

पूर्णा /कोरोनामुळे २१ दिवसांचा लोकडाऊन केल्याने गेल्या पाच सहा दिवसापासून रोजमजुरीची सर्व कामे ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने काही जणांनी "हात मदतीचा"  या शीर्षाखाली गरजवंतांना धान्य देण्याचे नियोजन करण्यात आले.
------------------------------------------------------------
💥पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमें यांच्या कडूनही हात मदतीचा...!

💥हात मदतीचा...केंद्राला भेट देऊन केले कार्याचे कौतूक💥

पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी आज शहरातील सुमन मंगल कार्यालयातील हात मदतीचा..या गोरगरीब रोजमजूर शेतमजूर व फेरीवाले यांच्या मदतीला धावून आलेल्या मित्र मंडळा द्वारे चालवण्यात येत असलेल्या मदत केंद्राला भेट दिली यावेळी उपस्थित हात मदतीचा...या उपक्रमाचे संयोजक तथा जेष्ट विधितज्ञ व अन्य सदस्यांचे कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात प्रबोधन केले.यावेळी पो.नि.भुमे यांनी प्रशासनाचे निर्देश पाळून गोरगरीबांच्या मदतीला धावून आल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले व यावेळी आपल्याकडूनही हात मदतीचा...देत त्यांनी यावेळी स्वतःच्या पगारातून ५०००/-रुपयें त्यांनी मदत जाहिर केली...
-----------------------------------------------------------

  कोरोनामुळे सद्या देशात अस्थिरता पसरल्याने केंद्राने २१ दिवसांचा केलेल्या अचानक लोकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्यांची अवस्था बिकट झाली आहे. चार पाच दिवस कसे तरी कटले परंतु पुढील दिवसात पोटची खळगी भरण्याचा बिकट प्रशन निर्माण झाला आहे. अश्या गरजवंतांना घरपोच मदत करण्यासाठी "हात मदतीचा" या शीर्षाखाली दानशूरांना आर्थिक व धान्याची मदत करण्याचे आव्हान करण्यात आले.
सदरील मदत ही शहरातील सुमन मंगल कार्यालयात जमा करून लवकरच शहानिशा करून वाटप करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, गोडतेल व दोन प्रकारच्या डाळीचे पॉकेट अश्या प्रकारे धान्य गरजू कुटुंबास घरपोच देण्याचे नियोजन करण्याचे ठरले. यावेळी   सदरील मदत ही शहरातील सर्व समाजातील गरजवंतांना देण्यात येणार. मदतीसाठी आव्हान असंख्य दानशुर दात्यांनी अगदी निस्वार्थपणे मदत केली.या दानशुरांमध्ये परिस्थितीची जान असणारे प्रतिष्ठित नागरीक व्यापारी आजी/माजी लोकप्रतिनिधी,डॉक्टर,वकील,पत्रकार,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,समाजसेवक,नौकरदार वर्ग यांचा समावेश असून यांच्या मदतीतून आलेले जिवनावश्यक खाद्य सामग्री जमा करून ठेवण्यात येत असून.आणखी दोन दिवस साहित्य जमा करून प्रति कुटुंबा प्रमाणे गरजवंतांची शहाणीशा करुन वाटप करण्यात येणार आहे. तसेच आणखी काही दानशुरांना मदत करावयाची असल्यास सय्यद अब्बास हुसेन स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक 30770606180, IFSC code 0004561, Branch code 04561 तसेच PhonePe  द्वारे सुद्धा मोबाईल क्रमांक 9326999996 वर ही नगदी मदत पाठवू शकता. किंवा शहरातील सुमन मंगल कार्यालयात ही आर्थिक अथवा धान्याची मदत स्वइच्छेने जमा करण्याचे आवाहन "हात मदतीचा..." वतीने करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या