💥सेलूत एका उच्चभ्रू महारथींच्या जुगार अड्ड्यावर सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची धाड..!


💥उच्च विद्या विभुषीत,राजकारणी हाय प्रोफाईल लोकांनी मिळून जनता कर्फ्यू दिनी मांडला जुगाराचा डाव💥

पूर्णा/वेळ मिळाला म्हणून जनता कर्फ्यू दरम्यान सेलू तालुक्यात दिवसभर जुगार खेळणाऱ्या एका उच्चभ्रू महारथींच्या जुगार अड्ड्यावर सेलू चे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी धाड टाकून जुगाराचे साहीत्य,रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
 वातावरणात रविवारी परभणी जिल्ह्यातील महसूल खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी जबरदस्त कामगिरीची नोंद केली एवढेच नव्हे तर अत्यंत धाडसाने एका मोठा जुगार अड्ड्यावर धाड टाकून अनेक प्रकारचे साहित्य जप्त केले.

           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २२ रोजी 'जनता कर्फ्यू'ची हाक दिली. यामुळे संबंध परभणी जिल्ह्यात रस्त्यावरची वाहतूक थंडावली बाजार पेठेत शुकशुकाट पहावयास मिळाला. मात्र असे असतानाही  जिल्ह्यातील सेलू तालुक्यात मात्र उच्च विद्या विभुषीत,राजकारणी हाय प्रोफाईल लोकांनी मिळून जनता कर्फ्यू'दिवशी जुगाराचा डाव मांडला होता.
दिवसभर लोकरक्षणासाठी जिवन धोक्यात घालून कर्तव्यावरील सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार बालाजी शेवाळे  यांना याजुगार अड्ड्याची खबर लागली.वेळ न दवडता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन छापेमारी केली.यात त्यांनी जुगाराचे साहीत्य,रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल व काही जणांना ताब्यात घेतले असून काही जणांनी अधिकाऱ्यांचा ताफा येत असल्याचे लक्षात येताच येथून धुम ठोकली. याप्रकरणी सेलू पोलिस अधीक तपास करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या