💥गरजू कुटुंबांना 'शिव भोजन' योजनेच्या संकल्पनेतून माफक दरामध्ये जेवणाची व्यवस्था💥
परभणी दि.30:- जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत कोणत्याही स्वरूपाच्या सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गरीब, मजुर तसेच गरजू कुटुंबांना 'शिव भोजन' योजनेच्या संकल्पनेतून माफक दरामध्ये जेवणाची व्यवस्था जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात आली आहे. तरी गरीब व गरजू व्यक्तींनी 'शिवभोजन' या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये याबाबत दक्षता म्हणून शासनाच्या निर्देशानूसार पात्र शिधापत्रीका धारकांना माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात येत आहे.
शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची कोणत्याही स्वरूपाची माहिती जिल्हाधिकारी अथवा तहसिल कार्यालयामार्फत संकलीत करण्यात येणार नाही. तरी शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत स्वस्त धान्य वितरीत करण्यासाठी माहिती संकलीत करण्यात येत असल्याचा व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत होणारा संदेश व नमुना खोटा आहे. असेही स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे...
0 टिप्पण्या