💥कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवा ― विशाल कदम जिल्हा प्रमुख💥राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या💥


परभणी/कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे या कोरोना विषाणू बाधीत रुग्नांच्या संपर्कात येणाऱ्यांना याचा फटका बसत असल्यामुळे कोरोना विषाणू बाधीत रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना ग्रस्त रुग्नांची संख्या काल दि.२१ मार्च २०२० रोजी ६३ वर पोहोचली आहे.कोरोना या भयंकर वैश्विक महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व या भयंकर विषाणूचा संसर्ग  रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे प्रखर लढा देत आहेत त्यांच्या या कोरोना विरोधातील लढ्यात आम्हाला ही सहभाग नोदवून त्यांचे हात बळकट करायचे आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ०७-०० ते रात्री ०९-०० वाजेपर्यंत परभणी जिल्ह्या व पुर्णा तालुक्यासह संपूर्ण तालुक्यांतील लोकांनी आपल्या घराबाहेर न निघता 'जनता कर्फ्यू' मध्ये सहभाग नोंदवून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन परभणीचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.नागरिकांनी आज २२ मार्च रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवून तुमच्या आमच्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घालून आपले कर्तव्य यशस्वीपणे बजावणाऱ्या आरोग्य रक्षक डॉक्टर तसेच आम्हाला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या नर्स,आमच्यासाठी रस्त्यावर उतरून वेळोवेळी आमच्यासह आमच्या कुटुंबासाठी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार न करता अहोरात्र रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूता समान जन रक्षकांना सहकार्य करा असे आवाहनही शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केले आहे...


   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या