💥खाकी वर्दीतल्या देवदूतांनी उपाशी गोरगरीब रोजमजूरांच्या मुखात भरवाला अन्नाचा घास'💥
पुर्णा/शहरातील गोरगरीब वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब रोजामजूर शेतमजूर हातावर पोट असणारे फेरीवाले यांच्यावर लॉकडाऊन संचारबंदी मुळे काम नसल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली असतांना
आज मंगळवार दि.३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे सपोनी. श्री.प्रविण धुमाळ.पोहेकॉ.नितीन वडकर व सहकारी कर्मचाऱ्यांचा ताफा मदतीला धावून आला अचानक आलेल्या या पोलीस ताफ्यामुळे काही काळ भेदरलेल्या या उपाशी गोरगरीबांना जेव्हा कळाले की पोलीस स्थानकाचे मोठे साहेब स्वतः आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यास आले तेव्हा मात्र यातील अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले यावेळी पुर्णा पोलीस प्रशासनाने या गोरगरीबांना स्वतःच्या खर्चातून मसालेभात व बिस्कीटाचे वाटप केले.पोलीस प्रशासनाने जोपासलेली मानुसकी पाहून या गोरगरीबांना काही काळ असे वाटले असेल की खाकी वर्दीत जनुकाही देवदुतच मदतीला धावून आले पुर्णा पोलीसांच्या या कौतुकास्पद कार्याला बघून सहजत तोंडातून शब्द बाहेर आले 'वर्दीतल्या मानुसरुपी देवदूता तुझ्या मानुसकीला शतशः सलाम'....
0 टिप्पण्या