💥कायदा व सुव्यस्थेसाठी सतत धडपणाऱ्या खाकी वर्दीतील जन रक्षकाला देवाने अंतर्यामी बनवले असते तर ?




💥कदाचित गुन्ह्यांसह गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर निश्चितच अंकूश निर्माण झाला असता💥

✍वास्तव-सत्यता - चौधरी दिनेश (रणजीत सी.)
***********************************

सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या कुटुंबाकडे सपशेल दुर्लैक्ष करीत सन उत्सव असो महामारी असो की नैसर्गिक आपत्ती प्रत्येक संकटावेळी अहोरात्र डोळ्यात तेल ओतून जागता पाहारा देणाऱ्या त्या खाकी वर्दीतील जन रक्षकाला कदाचित इश्वराने मानसातील मानुसकी आणी मनुष्यरुपी राक्षसी प्रवृत्तीतील राक्षसी प्रवृत्ती ओळखण्या इतपत अंतर्यामी बनवले असते तर कदाचित अपराध्यांना निरपराधी आणी निरपराध्यांना अपराधी बनण्याची वेळच आली नसती आणि सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी सतत धडपडत पोलीस प्रशासनात राहून कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दितील या मनुष्यरूपी देवदूताकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन ही बदलला असता ना ? जनसामान्यांवर येणाऱ्या प्रत्येक संकटावेळी स्वतःच्या कुटुंबाचा एकमेव आधार असणारा खाकी वर्दितील हा मनुष्यरुपी देवदूत स्वतः जनसामान्यांची प्रबळ ढाल बनून खंबीरपणे संकटा समोर प्रत्यक्ष स्वतः उभा टाकतो परंतु यानंतर ही जनसामान्यांच्या नजरेत बदणामच असतो दसरा असो दिवाळी असो की श्री.गणेश उत्सव-नवरात्र महोत्सव असो की रमजान ईद असो की महापुरूषांचा जन्मोत्सव असो किंवा नैसर्गिक आपत्ती कुठलाही सन उत्सव स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा करण्याचे भाग्य या खाकी वर्दितील देवदूताला लाभत नाही तो सातत्याने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी व जनसामान्यांनी सन-उत्सव शांततेत व आनंदात साजरे करावे यासाठी धडपडत असतो याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्लेग,स्वाईन फ्ल्यू,इबोला व्हायरस,डेंगू,आदी जिवघेण्या आजारांसह सद्या संपूर्ण जगात हाहाकार माजवत असलेल्या 'कोरोना व्हायरस' या भयंकर जिवघेण्या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असतांनाही पोलीस प्रशासनात कार्यरत खाकी वर्दितील देवदूत स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या जिवाची यत्किंचितही काळजी नकरता जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी केवळ अंगावरील खाकी वर्दी आणी स्वतःच्या खिशातील रुमालाला कवचकुंडल बनवून रस्त्यावर उतरून जनसामान्यांना या भयंकर महामारीपासून वाचवण्यासाठी रात्रंदिवस तळमळ करतांना पाहावयास मिळत आहे.
------------------------------------------------------------

पोलिस प्रशासनात यशस्वीपणे कर्तव्य बजावणाऱ्या   कतृत्ववान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कतृत्वाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यां प्रमाणेच सर्वसामान्य जनतेने ही घ्यायलाच हवी कारण प्रत्येक गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करणारा खाकी वर्दीतील हा देवदूत काम जरी पोलीस प्रशासनाचे जरी करीत असला तरी सर्वसामान्यांनाच न्याय देण्याचे काम करीत असतो मग वरिष्ठ अधिकारी जरी त्या वर्दीतील देवदूताला सन्मानीत करीत असले तरी त्याच्या कर्तृत्वाची खरी दखल जनसामान्यांनीच घ्यायला हवी ना ?
------------------------------------------------------------
 शेवटी खाकी वर्दीत राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या हा खाकी वर्दीतील देवदूता समान तुमची आमची सेवा करणारा सुध्दा मनुष्यच तर आहे ना ? त्याला सुध्दा स्वतःचा जिव व एक तुमच्या आमच्या सारखे कुटुंब आहेच ना ? रात्रीच्या वेळी डोळ्यात तेल ओतून गस्त घालायची आणी तुम्ही सुरक्षीत कसे राहाल याची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडायची यावर ही एखादी चोरीची घटना घडली की त्याच्या कर्तृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होणारच शेवटी खाकी वर्दीत वावरणारा हा देवदूत सुध्दा मनुष्यच आहे ना ?
खाकी वर्दीतील या जन रक्षकाकडून सर्वसामान्य जनतेला भरपूर अपेक्षा असतात परंतु त्यांची वेळोवेळी होणारी उपेक्षा आणि कुटुंबांची होणारी अव्हेलना कोणालाही दिसत नाही सर्वात जास्त दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक चुक करणारे लोक त्यांच्याकडून अनेक वेळा माफीची अपेक्षा ठेवतात परंतु त्यांच्या हातून कर्तव्य बजावतांना नकळत एखादी चुक झाली तर चुकीला माफीच नाही असे म्हणत स्वतःच न्यायाधीश बनून तात्काळ शिक्षाही सुनावतात असे का ? त्यामुळे मला असे वाटते की जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या खाकी वर्दीतील या जन रक्षकाला देवाने अंतर्यामी बनवले असते तर निश्चितच वाढत्या गुन्ह्यांसह मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या गुन्हेगारीच्या प्रमाणावर निश्चितच अंकूश निर्माण झाला असता परंतु शेवटी तुमच्या आमच्यासह आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी धडपडणारा हा खाकी वर्दीतील देवदूत मनुष्यच ना ?

-चौधरी दिनेश (रणजीत सी.)
मो.9146687777

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या