💥पुर्णेत लॉकडाऊनचा गैरफायदा,संधीसाधू व्यापाऱ्यांकडून जिवनावश्यक वस्तूंची ज्यादा दराने विक्री....!


💥नागरिकांची आर्थिक पिळवणूक; जिवनावश्यक किराना सामान तसेच फळ भाज्यांची ज्यादा दराने विक्री💥

💥पँकींग पिठाची टंचाई करुन नागरिकांची लुबाडणूक,आडत व्यापारपेठ बंद असल्याने नवीन गव्हाची आवकही बंद💥

पुर्णा/संपूर्ण जगात थैमान घातलेल्या व जागतिक महामारी म्हणून संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नए याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह महाराष्ट्र राज्यातही दि.२३ मार्च २०२० पासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली राज्यासह परभणी जिल्ह्यात संचारबंदी लागल्यामुळे अगोदरच जिल्ह्यातील नागरिक कोरोना सारख्या भयंकर विषाणूंशी लढा देत असतांनाच नागरिकांना व्यापार पेठेतील जिवनावश्यक वस्तुंचे साठे करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या संधीसाधू साठेबाज विषाणूंशी लढण्याची वेळ आल्याचे पाहावयास मिळत असून मरणासन्य अवस्थेत असलेल्या अर्धवट मेलेल्या जनावरांवर जशी गिधाड तुटून पडतात व लचके तोडतात अशी भयंकर अवस्था सध्या झाल्याचे दिसत असून संचारबंदी मुळे हाताला काम नसलेल्या गोर गरीब रोजमजूर फेरीवाले,शेतमजूर,फिरस्ती किरकोळ व्यवसायीक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असतांना शहरातील तसेच ग्रामीण भागातील हीं काही किरकोळ व होलसेल व्यापारी जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाल्याचे चित्र रंगवून नागरिकांचे आर्थिक व मानसिक शोषण करतांना पाहावयास मिळत आहे.
शहरातील गोरगरीब रोजमजूर शेतमजूर रोजंदारी कामगार फेरीवाले व ज्यांचे हातावर पोट आहे अश्या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नए याकरिता शहरातील जेष्ट विधितज्ञ तथा समाजसेवक ॲड.अब्बास हुसेन यांच्या संकल्पनेतून 'हात मदतीचा'.... या सामाजिक संघटनेतून शहरातील दानशूर काही लोकप्रातिनिधी,डॉक्टर्स,पत्रकार,समाजसेवक,प्रतिष्ठित व्यापारी मित्रांच्या सहकार्याने जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे.शहरातील काही समाजसेवी संस्थाही आपआपल्या परीने गोरगरीब रोजमजूरांना किरकोळ फेरीवाले व्यवसायीकांना मदत करीत आहेत परंतु कोरोना व्हायरस या जागतिक महामारी ठरत असलेल्या काळात संचारबंदी लागू असतांना अश्या भयावाह परिस्थितीत हीं शहरातील काही गरीब वसाहतीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेत भेदभावाची दरी निर्माण करुन काही धर्मांध जातीयवादी पुढारी उपाशी पोटाला जाती-धर्माचे लेबल लावून या गंभीर परिस्थितीचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी फायदा घेण्याचा निर्लज्ज पणा करीत आहेत तर याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे नवीन गव्हाचे उत्पन्न निघले असतांना ऐनवेळी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने आडत व्यापाऱ्यांनी आपली आडत दुकाने बंद ठेवल्याने गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असून अनेक साठेबाजांनी या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने साठेबाजीलाही सुरूवात केल्याचे दिसत असून किराना दुकानांवर गहू-ज्वॉरीची पिठाची पाकीट अतिरिक्त दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे २१ दिवस लॉकडाऊनचे कसे कटणार असा गंभीर प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे. कोरोनाशी लढत असताना शहरात वेळोवेळी जीवनावश्यक लागणारे वस्तूंची आवक होणे गरजेचे आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी काळात जिवनावश्यक वस्तूंची ज्यादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असतांनाही आवक मंदावल्याचे कारण सांगून शहरातील अनेक किरकोळ किराणा व्यापारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत गहू,ज्वारी गव्हाच्या पिठाची पाकीट,बेसनपीठ,तांदूळ,तुरदाळ,मुगदाळ,उडीददाळ,चनादाळ,मसूरदाळ,गोडतेल,साखर,आदींसह जिवनावश्यचक वस्तुंची अतिरिक्त ज्यादा दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक  करतांना दिसत आहेत.शासनाकडून व्यापाऱ्यांना जास्त दरात कोणतीही जिवनावश्यक वस्तू विक्री करु नका दंड आकारला जाईल अशा सूचना दिलेल्या असतांनाही कुठलाच फरक पडताना दिसत नसल्याने प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.तर याही पेक्षा गभीर बाब म्हणजे कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासन कठोर उपाययोजना करीत असतांना शहरासह ग्रामीण भागातही प्रतिबंधित गुटखा,सिगारेट, विडी,तंबाखू,देशी-विदेशी दारु अवैधरित्या छुप्या पध्दतीने मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. ५० रुपयें विक्रीदर असलेली देशी दारुची १८० एमएलची बॉटल २०० रुपयास तर १५० रुपये किंमतीची विदेशी दारुची १८० एमएलची बॉटल ३५० रुपयात डबल व टिबल किमतीत विक्री होत आहे. अवघ्या काही दिवसापूर्वी ५० रुपये किलो प्रमाणे बॉयलर चिकनची विक्री होत होती पण संचारबंदी काळात मात्र चिकन तीनपट १५० रुपये किलो प्रमाणे विक्री केल्या जात असून या जिवनावश्यक वस्तुंची अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या