💥शाहिन बाग च्या वतीने पै.सुनिल गडदे यांचा सत्कार...!



💥पहेलवान सुनील गडदे यांनी कूस्ती मध्ये नूकताच आळंदी किताब पटकावला💥

मानवत /प्रतिनिधी

मानवत चे भूमिपुत्र पहेलवान सुनील गडदे यांनी कूस्ती मध्ये नूकताच आळंदी किताब पटकावला त्या बद्दल मानवत येथे आज शाहीन बागमध्ये सर्व समाज बांधवांच्या  वतीने पै.सुनिल गडदे त्यांचे व  सहकारी चे भव्य सत्कार करण्यात आला.


मानवत येथील भूमिपूत्र पै. सुनिल गडदे यांनी नूकताच कूस्ती मध्ये विजयी होऊ आळंदी किताब मिळविल्याने मानवत च्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला त्या बद्दल त्याचा आज मानवत शहरातील छत्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्या जवळ शाहिन बाग आंदोलन सूरू असून आज आंदोलन कर्ते व मानवत शहरातील नागरीकांच्या वतीने शाहिन बागे मध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मानवत येथील  संविधान बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनंता मामा भदर्गे , उपाध्यक्ष , शामभाऊ चव्हाण , सचिव हबिब भडके , क्राॅ. राजन क्षिरसागर, क्राॅ.अनिल पंडीत , हबीब भडके, मौलाना मुजाहिद , मौलाना सलीम ,  मौलाना असलम , मौलाना अन्वर , फकीरा सोनटक्के , अशोक पंडित , नियामत खान , शेख मुस्ताक , यांच्या सह समाज बांधव व संविधान बचाव कृती समितीचे पदाधिकारी या वेळी  मोठ्या संख्येने उपस्थीत होते ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या