💥निर्भया हत्याकांडातील आरोपींची फाशी जन्मठेपेत रुपांतरीत करण्याची सुप्रीम कोर्टात मागणी..!💥अजीत न्युज हेडलाईन्स टुडेज - सुपर -६ न्युज💥 


💥 घटननेतील चौथा दोषो पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली💥


निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका (बचाव याचिका) सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात यावी अशी विनंती त्यानं या याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमंतीने पवनची याचिका फेटाळली. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती  देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
पवनने आपल्या याचिकेत म्हटले होते की, घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे.
न्या. एन. व्ही. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरीमन, न्या. आर. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी १०.२५ वाजता पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली. क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीमध्ये केली जाते, त्यानुसार ही सुनावणी देखील बंद खोलीत पार पडली. यापूर्वी उर्वरित तीन दोषींची क्युरेटिव्ह याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.
दरम्यान, पवनकडे आता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली होती. कनिष्ठ कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

*********************************

💥उत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, किम जोंग यांनी दिले गोळ्या घालण्याचे आदेश...!

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला असून 83 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर उपचार करण्याऐवजी किम जोंग यांनी त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांनी कोरोना रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी त्याला थेट गोळ्या घाला असा आदेश किम जोंग यांनी दिला आहे. उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती चीनमध्ये परतली आहे. या व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

************************************

 💥तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू...!


तुर्कीने सीरियावर ड्रोन हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 19 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तुर्कीने रविवारी सीरियाचे दोन फायटर जेट पाडले. न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की सैन्याने सीरियावर ड्रोन हल्ला केला असून यामध्ये 19 सैनिकांचा मृत्यू  झाला आहे.

तुर्कीने रविवारी सीरियाचे दोन फायटर जेट पाडले. यामुळे आता रशिया आणि तुर्कीमधील तणाव आणखी वाढला आहे. उत्तर-पश्चिम सीरियातील इदलिब प्रांतात अनेक आठवडे सुरू असलेल्या हिंसाचारानंतर गेल्या आठवड्यात सीरिया हवाई हल्ल्यात अनेक तुर्की सैनिक मारले गेले. त्यानंतर तुर्कीने रशिया समर्थक सीरिया सेनेविरोधात एक लष्करी मोहिम सुरू केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

************************************

💥 मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू...!


मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन एक्सप्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉईंट खंडाळा येथील तीव्र व धोकादायक वळणावर हा अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे पिठाची पोती घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला. या अपघातात मुंबईहून पुण्याकडे येणारे तीन दुचाकीवरील सहा दुचाकीस्वार लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता भरधाव टेम्पो त्यांच्या अंगावर पलटला.

भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एक जण सुदैवाने बचावला आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले होते तेथून पुन्हा (तळेगाव) पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहे.

***********************************

 💥माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल...!


 भूखंडाशेजारी टपरी लावल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून माजी आमदार तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रासिटी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार हर्षवर्धन जाधव  यांचा भाग्यनगर येथे भूखंड आहे. याच्या शेजारी नितीन दाभाडे यांनी टपरी उभारली होती. टपरी लावल्याच्या कारणावरून जाधव यांनी २९ फेब्रुवारीस तांगडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रांती चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

**********************************

💥ट्रम्प येतील तेव्हा रस्त्यावर उतरा,उमर खालिदच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ व्हायरल...!


 दिल्लीत भडकलेल्या जातीय दंगलीची आग आता विझली असती तरी तिच्या झळा अद्याप जाणवत आहेत. या दंगलीमुळे आतापर्यंत सुमारे ४६ जणांचा बळी गेला आहे. या राजधानीत भडकलेल्या या हिंसाचारासाठी भाजपा नेते कपिल मिश्रास तसेच भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची प्रक्षोभक विधाने जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.  मात्र दिल्लीत दंगल भडकण्यास कारणीभूत ठरलेल्यांमध्ये अजून एका नावाची भर पडण्याची शक्यता आहे. देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयू विद्यार्थी उमर खालीद याच्या एका भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उमर खालिद हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन लोकांना करताना दिसत आहे.

 उमर खालिद हा विद्यार्थी नेता आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत आला आहे. आता त्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ हा यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हे प्रक्षोभक भाषण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पूर्वी १७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे दिले होते.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना पूर्वोत्तर दिल्लीत दंगल भडकली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उमर खालिद याच्यावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या