💥पुर्णा तालुक्यात निसर्गाने केली अन्नदाता शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा,शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला..!



💥वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पाऊन व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान💥

पूर्णा/तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे निसर्गाने अन्नदाता शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केल्याचे दिसत असून शेतकऱ्यांच्या शेतातील कापनीला आलेला हरभरा,गहु,टाळकी ज्वारी,संत्रा, काढलेल्या शिजवलेल्या हळदी अदी पिकाचे आतोनात नुकसान झाल्याने अन्नदाता शेतकरी अक्षरशः हवालदील झाल्याचे दिसत आहे.
       काल बुधवार दि.१८ मार्च २०२० रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वारा व जोरदार झालेल्या पाऊस आणी गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला. गहु कापलेला व उभा असलेला
गव्हाच्या लोंबी मध्ये पाणी जावून काळपट होतात , गरभरा काडलेले कडपे वाऱ्याने उडुन गेले,अल्पशहा प्रमाणात मोठ्या थेंबाचा पाऊस व गाराच्या पावसाने हरभरा घाठे तुटून पडुन नुकसान  , ज्वारीचे  कडबा काळा , ज्वारीचे कणिसामध्ये पाणी साचुन काळे पडते , संत्र्याच्या बागामध्ये फळे भरपुर लागल्याने फाटे मोडुन पडले , वादळी वाऱ्याने फळाची गळती झाली . अचानक आलेल्या पावसाने शेतकर्याची धावपळ व धांदल उडाली शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले .
-------------------------------------------------------------
   तालुक्यातील मौ.गौर येथील शेतकरी निवृत्ती सोपान जोगदंड यांचा चार एकर गहु व हरभरा दोन एकर काढले होती वादळी वाऱ्याने शेजाऱ्याच्या वावरात उडुन गेल्याने खुप मोठे नुकसान झाले .शासनाने कितीही नुकसान भरपाई दिली तरी एका एकराचे उत्पन्न आम्हाला समाधान करते म्हणून निसर्गाची अवकृपा खुपच मोठे दु:ख देवून जाते .नुकसानीचे पंचनामे करावेत असे बोलून परीसरातील
-------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या