💥महिला चोरट्यांनी केला गल्ला साफ,आडत व्यापाऱ्यां मध्ये भितीचे वातावरण💥
पुर्णा/शहरातील नवा मोंढा परिसरातील श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात आज मंगळवार दि.१७ मार्च रोजी भर दुपारी ०४-३५ वाजेच्या सुमारास भिक मागण्याच्या निमित्ताने आलेल्या ४ महिलांनी अॉफीस मधे कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत कॉन्टर मधील ड्राफ मधील तब्बल ३ लाख रुपयांची रक्कम पळवल्याची घटना घडल्या मुळे परिसरातील आडत व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून मागील चोऱ्यांच्या घटनांचा तपास अद्यापही गुलदस्त्यातच असतांना भर दुपारच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटने मुळे शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून संबंधित आडत दुकानाचे मालक विशाल चितलांगे यांनी या घटने संदर्भात पुर्णा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दिली असून पुर्णा पोलीसांचे पथक या घटनेतील महिला आरोपींच्या शोधात रवाना झाल्याचे समजते...
0 टिप्पण्या