💥तहसिलदार टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बिजमवार यांच्या पथकाचे कारवाई नाट्य ?💥
पुर्णा/तालुक्यात पुर्णा-गोदावरी नदी पात्रात चोरट्या रेतीचे अवैध उत्खनन व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रेती तस्करी विरोधात अजीत न्युज हेडलाईन्स वेब वृत्त वाहिणीवर वृत्त प्रकाशित होताच निद्रीस्त अवस्थेचे सोंग घेतलेल्या महसुल प्रशासनाला अचानक जाग आल्याचे दिसत असून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशानुसार तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत बिजमवार व ना.त.वंदना मस्के मंडळ अधिकारी वाघ,तलाठी आहीरे,घाटोळ,अरविंद डांगे, अभिजीत पाटील आदींच्या महसुल पथकाने सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छापा मारला यावेळी त्यांना माटेगांव येथे१५ तर पिंपळगाव (बा)येथे १२ असे मिळून एकूण २७ तराफे जाळून नष्ट करण्यात आले.तर दोन्ही ठिकाणांहून अवैधरित्या वाळू उपसा केलेली अंदाजे ३० ते ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
0 टिप्पण्या