💥नेहरू युवा केंद्र नांदेड व मा संतोषी ग्रामीण विकास मंडळ यांच्या वतीने अन्नदान वाटप...!



💥चालू असलेल्या कार्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक करण्यात आले💥
.
नांदेड प्रतिनिधी:
नेहरू युवा केंद्र व मा संतोशी ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमातून  समाजाची सेवा करण्यामध्ये सहभाग घेतला जातो..
गरीब रोज मजुरी करून घेणाऱ्या अशा मागास भागात यांच्यावतीने अन्नदान केले जात आहे.
हे तर आज माधव पाटील यांच्या कडून खिचडी वाटप करण्यात आली...
हे अन्न दान हे लॉक डाऊन संपेपर्यंत आयोजित केले आहे अशी माहिती नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक चंदा रावळकर यांनी बोलताना माहिती दिली.
त्याच बरोबर यामध्ये समाजातील दानशूर लोकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे. व त्यांनी चंदा रावळकर व जयश्री जयस्वाल यांच्याशी संपर्क साधावा . व
ज्या लोकांची हातावर पोट असतात. या  लोकांसाठी चंदा रावळकर यांनी ही संकल्पना राबवली . या संकल्पनेची पंतप्रधान यांच्या ट्विट मधून यांचे अभिनंदन करण्यात आले. व पंतप्रधान कार्यालय दिल्ली मधून देखील कौतुक करण्यात आले. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून चंदा मॅडम ह्या समाजातील प्रत्येक  घटकासाठी सतत कार्यरत  राहतात.
त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून कोरोना आजाराची माहिती लक्षणे व स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे.हा उपक्रम यशस्वी करण्या साठी गौरव,कृष्णा,धनंजय यांनी परिश्रम घेतले..,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या