💥परभणी जिल्हा आरोग्य विभाग कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सक्रीय...!



 💥जिल्हा रुग्णालयात ७४ रुग्णांची झाली नोंद एकुण घेण्यात आलेले स्वॅब ५७ त्या पैकी ३१ नेगीटिव्ह असुन १७ स्वॅब अहवाल प्रलंबित💥

परभणी/जिल्हा आरोग्य विभाग कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत सक्रीय झाला असून शासकीय रुग्नालयात आज सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात खालील प्रमाणे प्रेस नोट.
आज दिनांक २३.३.२०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजे पर्यंत
जिल्हा रुग्णालय परभणी येथे ७४ रुग्णांची नोंद झालेली त्याची वर्गवारी खालील प्रमाणे आहे
नोट एकुण घेण्यात आलेले स्वॅब ५७ व त्या पैकी ३१ नेगीटिव्ह असुन १७ स्वॅब अहवाल
प्रलंबित आहेत. (९ स्वॅब रिजेक्टेड आहेत)
त्या पैकी ४५ परदेशातुन आलेले व (त्यांच्या सहवासातील) व देशातंर्गत.४ असे एकुण
४९ नागरिक निगराणीखाली आहे सदर नागरिकापैकी असुन १५ नागरिक रुग्णालयत
विलगीकरण कक्ष मध्ये उर्वरित ५९ नागरिक त्याचे घरी विलगीकरण ( होम क्वारंटाईन)
करण्यात आलेले आहे.त्यांच्या निवासस्थानी वैद्यकिय पथकामार्फत फेर तपासणी करण्यात
आलेली आहे. सदर ५९ रुग्णाची प्रकृति स्थिर आहे. आज
रुग्णालयात नोंद झाली.व कोरोना बाहय रुग्ण विभागात १०५ संशयीत रुग्णांची तपासणी
करण्यात आली आज एकुण ११ रुग्णांचा नमुना ( स्वॉब) तपासणीसाठी एन.आय.व्हि (राष्ट्रीय
विषाणु संस्था )पुणे येथे पाठविण्यात आला आहे.
जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हयामध्ये कोरन्टाईनसाठी ३२० खाटा
व आयसोलेशनसाठी शासकिय व खाजगी असे एकुण २२५
आहेत.
जिल्हयामध्ये कोरोना प्रतिबंधक मोहिम अधिक प्रभावी पणे राबविण्यासाठी
जिल्हाधिकारी परभणी यांनी श्री अंकुश पिनाटे,निवासी उप जिल्हाधिकारी परभणी,डॉ.संजय
कुडेटकर उप जिल्हाधिकारी (सा.प्रशासन ),श्रीमती स्वाती सुर्यवशी उप जिल्हाधिकारी
(रोहोयो ), श्री काटकर उप प्रादेशीक परिवहन अधिकारी, श्री ज्योत्साना धुळे प्रभारी जिल्हा
पुरबठा अधिकारी,डॉ.बी.एस.नागरगोजे जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी,डॉ.शंकरराव देशमुख
जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी,श्री रमेश पवार आयुक्त मनपा,श्री मुळे पोलिस
उपअधिक्षक(गृह),श्री यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ), श्री सरकटे सहाय्यक
आयुक्त,अन्न व औषधी प्रशासन,श्री अर्जुन झाडे जिल्हा नियोजन अधिकारी, यांना नोडल
अधिकारी म्हणुन आदेशीत करण्यात आलेले आहे.
तसेच जिल्हयात परदेशातुन मागिल १५ दिवसात आलेल्या नागरिकाविषयी जिल्हा
आपत्ती प्रशासनास ०२४५२ २२२५६०्या नंबरवर संपर्क करण्यात यावा असे अहवान केले.
आज रोजी दिनांक २३/३/२०२० रोजी सांयकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हयात कोरोना
विषाणु बाधीत एक ही रुग्ण नसल्याचे आम्ही जाहीर करित आहोत.
जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवु नये.
असे व अनाहुतपणे अफवा पसरु नये
नविन ७ रुग्णांची जिल्हा
खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
असे जिल्हाधिकारी दिगंबर मुगळीकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या