💥परभणी जिल्हा पोलीस प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान..!💥पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तबगार कर्मचारी विनोद रत्ने यांच्या कर्तृत्वाची जि.पो.अधिक्षकांनी घेतली दखल💥 

परभणी/जिल्ह्यात पोलीस प्रशासनात कार्यरत कर्तृत्ववान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कर्तव्य दक्षतेला प्रोत्साहन देणारे जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कृष्णकांत उपाध्याय यांनी मागील काही दिवसात खून आणि चोरीच्या घटनांचा लावण्यात आलेला तपास आणि विविध खटल्यामध्ये न्यायालयाने दिलेले निकाल यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान आज शनिवार ७ मार्च २०२० रोजी आयोजित गुन्हे बैठकीत केला.

मागील जानेवारी-फेब्रुवारी या २ महिन्याच्या कालावधीत हत्या व चोरीचे सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात कठोर शिक्षा होई पर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला तपास या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हें शाखेचे कर्तृव्यदक्ष पो.नि.प्रविण मोरे, सपोनि.बाचेवाड, सपोउपनि.एस.बी.चौरे, सपोउपनि.चव्हाण, सपोउपनि. गायकवाड, सपोउपनि. जाधव, सपोनि. भारत जाधव, सपोनि. एस.एस पवार,पोउपनि. नागनाथ तुकडे, सपोउपनि. हनुमान कच्छवे, सपोनि. दिनेश मुळे, सपोनि. हनुमंत पांचाळ,शंकर राठोड, संजय काळे, विभीषण मुंढे, नामदेव घरजाळे,सखाराम देवकते,कुंडगीर दिवे,वंदना आदोडे,रसुल शेख,अशोक झमकडे,मुंजा पायघन, समीर पठाण,बालकिशन मगर,सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, सुरेश डोंगरे,अरूण पांचाळ,संजय शेळके, किशोर चव्हाण,जमिरोद्दीन फारूखी,अरुण कांबळे उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी विनोद रत्ने यांचाही विशेष कामगिरी बजावल्या बद्दल विशेष सन्मान केला.खाकी वर्दीत कार्यरत राहून जनसामान्याशी बांधिलकी जोपासत अनेक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा होई पर्यंत तपास करणाऱ्या पुर्णा पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी रत्ने यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सन्मान केल्या बद्दल त्यांचे अजित न्युज हेडलाईन्स परिवार व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार दिनेश चौधरी,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड,मा.नगरसेवक देवेंद्र राठौड,सुनील जाधव,दिनेश सोनकांबळे,रामा पारवे,राज नारायनकर,यांनी अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या