💥पुर्णा तालुक्यातील माटेगाव शिवारातील अवैध रेती धक्क्यावर प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन...!💥माटेगाव-कान्हेगाव परिसरात चालणारा अवैध रेती धक्का देतोय महसुल प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची साक्ष💥

पुर्णा/तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदी पात्रातील एकाही रेती स्थळाचा अद्याप पर्यंत लिलाव झाला नसतांनाही शहरासह संपूर्ण तालुक्यातील रस्त्यावरून असंख्य अवैध चोरट्या रेतीची वाहतूक करणारी वाहन रात्रंदिवस भरघाव वेगाने चालतांना महसूल प्रशासन वगळता सर्वसामान्य जनतेला पाहावयास मिळत असून शासनाचा लाखों रुपयांचा महसूल भ्रष्ट शासकीय अधिकारी व रेती माफिया मिलबाटके गिळकृत करतांना पाहावयास मिळत आहे.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अवस्था तर अशी झाली आहे की रेती तस्करांनो 'जोडाने हाणा पण मांगीलाल म्हणा' प्रतिरोज हजारों ब्रास रेतीची राजरोसपणे रात्रंदिवस तस्करी होत असतांना महसूल प्रशासनाची अवस्था अक्षरशः धृतराष्ट्रा समान झाल्याने रेती तस्कर मात्र आपल्या कौरव कृत्याने संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजवत असून परिसरातील शेतकरी,आसपासच्या गावातील नागरिक यांच्यासह महसूल प्रशासन पोलीस प्रशासनावर ही दहशत निर्माण करतांना पाहावयास मिळत असून रेती तस्करांच्या या दहशतवादी प्रवृत्तीचा फटका मागील काळात दस्तुरखूद्द पुर्व तहसिलदार एस.आर.मदनूरकर विद्यमान तहसिलदार पल्लवी मेककर,तलाठी तुपसमुंदर,तसेच महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनातील हीं कर्मचाऱ्यांना बसल्याचे दिसत आहे.परंतु यानंतर ही अवैध रेती उत्खनन व रेती तस्करीला यत्किंचितही आळा बसला नसल्याचे दिसत असून प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या अवैध चोरट्या रेती तस्करी मिळणाऱ्या बेसुमार पैश्यातून रेती तस्कर चोरट्यांची हिंमत भयानक वाढल्याचे दिसत असून तालुक्यात रेती तस्करांच्या संघटीत टोळ्या निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे या टोळ्यांच्या दहशतीत परिसरातील सर्वसामान्य जनता शेतकरी वर्गच नव्हे तर प्रशासकीय अधिकारी सुध्दा वावरतांना दिसत असून माटेगाव-कान्हेगाव परिसरातील पुर्णा नदीपात्रात रेती तस्करांनी बेकायदेशीर धक्के तयार करुन अक्षरशः लुटमार चालवल्याचे दिसत आहे.
परभणी जिल्ह्याचे पुर्व कर्तव्यदक्ष व इमानदार जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांची बदली झाल्यानंतर तर जिल्ह्याची परिस्थितीच बदलल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील महसूल प्रशासनच नव्हे तर अवैध गौण-खनिज रेती तस्करही सैराट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या