💥सकाळी 6 वाजता पब्लिक कर्फ्यु बंदोबस्त साठी निघालेला नवरा रात्री 12.30 दमून घरी आला तर....


💥पोलिस पत्नी - बायकोने थाळी वाजवून स्वागत केले..

सकाळी 6 वाजता पब्लिक कर्फ्यु  बंदोबस्त साठी निघालेला नवरा रात्री 12.30 दमून घरी आला तर बायकोने थाळी वाजवून स्वागत केले. तर म्हणाला अग लोक झोपलीत नको वाजवू. ती थोडीशी हिरमुसली पण परत विचार केला वुठली लोक तर वूठली. आज माझ्या  माणसासाठी मी वाजवणार. आणि तिने तस केलही. नवरा आतून कुठे तरी सुखावला असणार. आत आल्यावर बायको आणि मुलाला डोळे भरून पाहत म्हणाला अग डब्यात चपाती शिल्लक आहे. तिने सकाळी थोडा जास्तीचा डबा दिला होता. आज सर्व बंद होते ना मग कोणी सहकाऱ्यांनी डबा नसेल आणला तर त्याची सोय.
तो अंघोळी ला गेला तो वर हिने गरम भजी तळायला घेतली रात्री 1 वाजता. होय 1 ला. काय भूक राहिली असेल बिचाऱ्याला. तसा आतून त्याने आवाज दिला. अग काय करतेस आता मला भूक नाही जास्त काही करू नकोस.
मला वरण भात दे फक्त. तिच्या जीवाची घालमेल झाली.
दिवस भर टीव्ही वर बातम्या पाहून हीचा जीव आधीच घाबरा
झाला होता त्याच्या काळजी ने पण चेहऱ्यावर काही दाखविले नाही.
2 घास कसे बसे खावून तो झोपला. सकाळी लवकर जायचे सांगून.पण हीची झोप पळून गेली.
आता पर्यंत तिने सर्व बंदोबस्त पाहिले होते. पण आज तिला कधी नव्हे ती इतकी भीती वाटली. कदाचित 26/11 नंतर पहिल्यांदा.
किती विचार आले मनात तिच्या काय बदल झाला 26/11 नंतर सुद्धा. परिस्थिती आहे तशीच आहे.
आणि आजही त्या च्या कडे काठीच आहे दहशत वाद्यांच्या मशीन गण ला वूत्तर द्यायला.
आणि आता कोरोनाला लढा देण्यासाठी ना पुरेसे मास्क आहेत ना sanitizer.

                       . तसू भर ही बदल नाही झाला. चार दिवस टीव्ही वाहिन्यांनी तथाकथित तज्ञांनी आरडाओरडा केला. लोकांनी कँडल मार्च काढला. चार दिवस दुखवटा पाळला. पाचव्या दिवशी जैसे थे.
नंतर साधे कोणी विचारायला ही आले नाही पोलिसांची परिस्थिती. मग त्यांचे कुटुंबाची विचारपूस लांब ची गोष्ट.
तिला बाहेर जावून ओरडून सांगावे वाटले जनतेला आणि सरकार ला आम्ही ही माणसे आहोत. आम्हाला ही भावना आहेत. आम्हाला ही भीती वाटते तुमच्या सारखी. आमचे माणूस गमावण्याची. या विचारात डोळ्यातून अश्रु आले कधी आले हे तिलाही नाही समजले.
वाटले वुठवावे त्याला आणि सांगावे द्या सोडून ही नोकरी.
पण लगेच तिने सावरले स्वतःला. तिला जवानांची पत्नी दिसली समोर. काय होत असेल तीच बॉर्डर वर नवरा असताना. एकटीने सर्व सांभाळताना. आपला नवरा रोज वुशिरा का होईना घरी येतो पण त्यांचं काय.
आणि तिला स्वताला अभिमान वाटला पोलिस पत्नी असल्याचा.
लेख आवडला तर नावसहित पोस्ट करा
1 पोलिस पत्नी
सौ. सुप्रिया सुधीर तरटे
कांदिवली चारकोप
मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या