💥जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येवू नये - जिल्हाधिकारी मुगळीकर



💥कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन💥

परभणी, दि. 17 :-  जिल्ह्यात साथरोग अधिनियम लागू केलेला असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी धार्मिक, सामाजिक तसेच विविध समारंभविषयक कार्यक्रम 31 मार्च 2020 पर्यंत घेण्यात येवू नयेत. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

            कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय व सामाजिक आणि व्यापारी संघटना, पत्रकार आदि मान्यवरांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, सहाय्यक पोलिस अधिक्षक नितिन बगाटे, महापालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्यासह धार्मिक, राजकीय, व्यापारी, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस कोरोना विषाणूचा  संसर्ग होत असल्याने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी गर्दी जमा होते अशा ठिकाण मंदिर, मस्जिद, विहार, चर्च  येथे  गर्दी करु नये असे सांगून मंदिरात भाविक आणि मस्जिदमध्ये मुस्लिम समाज नमाजसाठी  एकत्र येत असतो. त्यामुळे 31 मार्चपर्यंत हा कार्यक्रम बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीस विविध क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या