💥भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 10 वी पास ते इंजिनिअर बेरोजगारांसाठी नोकरीची संधी...!
💥14 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू 3 एप्रिल अर्ज करण्याची अखेरची तारीख💥

जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि अंतराळ विज्ञानात कारकीर्द घडवण्याचा विचार असेल तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
ISRO मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. इस्त्रोच्या ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’मध्ये (SAC – Space Application Centre) ही भरती होत असून यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 14 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 3 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.
पात्रता – इस्त्रो सॅक भरती 2020 च्या नियमानुसार विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. यामध्ये 10वी पास ते पीएचडी झालेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध आहे. याबाबतची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मिळेल.
वेतन – कमीत कमी २२ हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन लाख आठ हजार रुपये वेतन.

कोणत्या पदांसाठी भरती ?

इंजिनीअर एसडी इलेक्ट्रॉनिक्स – 2 जागा

इंजिनीअर एसडी फिजिक्स – 1 जागा

इंजिनीअर एससी कंप्यूटर – 3 जागा

इंजिनीअर एससी इलेक्ट्रॉनिक्स – 7 जागा

इंजिनीअर एससी मॅकेनिकल – 6 जागा

इंजिनीअर एससी स्ट्रक्चरल – 1 जागा

इंजिनीअर एससी इलेक्ट्रिकल – 1 जागा

टेक्निकल असिस्टंट

इलेक्ट्रॉनिक्स – 3 जागा

टेक्निकल असिस्टंट मॅकेनिकल – 1 जागा

टेक्निकल असिस्टंट सिव्हिल – 1 जागा

टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल – 1 जागा

टेक्निशियन बी फिटर – 6 जागा

टेक्निशियन बी मशीनिस्ट – 3 जागा

टेक्निशियन बी इलेक्ट्रॉनिक्स – 10 जागा

टेक्निशियन बी आयटी – 2 जागा

टेक्निशियन बी प्लंबर – 1 जागा

टेक्निशियन बी कारपेंटर – 1 जागा

टेक्निशियन बी इलेक्ट्रीशियन – 1 जागा

ड्रॉट्समॅन बी मॅकेनिकल – 3 जागा

टेक्नीशियन बी केमिकल – 1 जागा

एकूण पदांची संख्या- 55

कसा करायचा अर्ज –

या भरतीबाबतची आणि अर्ज भरण्याची सविस्तर माहिती
 https://recruitment.sac.gov.in/OSAR/main.jsp या लिंकवर मिळेल. याशिवाय ऑनलाइन अर्जाबाबतची माहिती https://recruitment.sac.gov.in/OSAR/pages/Rules.jsp  या लिंकवर मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या