💥अवैध व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींनी बनवल्या 'टोळ्या' ? प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह जनसामांन्यात दहशत💥
पुर्णा/तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध गौण-खनीज रेती तस्करी,प्रतिबंधीत अवैध जहरी गुटखा-तंबाखूजन्य पदार्थ तस्करी,खानावळ हॉटेलच्या नावावर सर्वत्र होणारी अवैध देशी-विदेशी दारु विक्रीसह शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणारी अवैध देशी-विदेशी दारुची तस्करी,अवैध गांजा अफीम विक्री,मुंबई-कल्याण-मिलन-नाईट-टाईम बाजार मटका,राजरोस चालणारे जुगार अड्डे,प्रचंड प्रमाणात चालणारी अवैध सावकारी,गोवंश-गोमांस तस्करी व राजरोसपणे होणारी विक्री आदी व्यवसायांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींनी भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत मजबूत पकड निर्माण केल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत असून गुन्हेगारी प्रवृत्तीनी या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध व्यवसायात आपले प्रस्थ निर्माण करण्यासाठी टोळ्यांसह गुप्तचर यंत्रणा अर्थात मुखबीरांच्या टोळ्या ज्याला त्यांच्या भाषेत लोकेशन गँग तयार केल्याचेही निदर्शनास येत असून या लोकेशन गँगच्या माध्यमातून सोशल मिडियायाचा पुरेपूर फायदा घेत वाट्सअप ग्रुप तयार करुन यातून या अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवून अधिकाऱ्यांना हुलकावनी देण्याचे काम केले जात आहे या वाट्सअप ग्रुप मध्ये अनेक कर्मचाऱ्यांही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
💥तालुक्यातील अवैध व्यवसायांनाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी चढवला धार्मिक व जातीय रंग ?💥
शहरी भागासह ग्रामीण भागातही अवैध धंद्यात सक्रीय झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे महसुल प्रशासन पोलीस प्रशासनातील अधिकारी/कर्मचारीही आता दहशती खाली वावरतांना पाहावयास मिळत असून यापुर्वी अवैध रेती उत्खनन व अवैध रेती तस्करी व्यवसायात सक्रीय झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींकडून पुर्व तहसिलदार शाम मदनूरकर यांच्यावर झालेला हल्ला,पुर्व जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांना झालेली अपमानास्पद वागणूक विद्यमान महिला तहसिलदार पल्लवी टेमकर यांना झालेली शिविगाळ,पोलीस कर्मचारी हनुमान गुट्टे यांना देण्यात आलेली धमकी या झालेल्या घटना अवैध व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाल्याची नांदी नाही काय ? आतातर अवैध रेती उत्खनन व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध रेती तस्करी,अवैध देशी-विदेशी दारु विक्रीसह मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध देशी-विदेशी दारु तस्करी,अवैध प्रतिबंधीत जहरी गुटखा तंबाखूजन्य पदार्थ गांजा तस्करीसह किरकोळ विक्री,मटका-जुगार आदी अवैध व्यवसायात सक्रीय झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी आता या व्यवसायांनाही जातीय व धार्मिक आधारावर विभागल्याचे दिसत असून आपआपले मुखबीर नेमून या मुखबीरांच्या मार्फत पोसीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी जवळीक साधून एकमेकांच्या धंद्यांवर धाडी टाकण्याचे प्रकार ही समोर येत असल्यामुळे यातून एक दिवस यातून फार मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलीस प्रशासनात मुखबीरी करणारे मुखबीर प्रत्यक्षात मात्र अवैध व्यवसाईकांचे हितचिंतक असल्याचे निदर्शनास येत असून यातील काही अवैध व्यवसाईकही असल्याचे सर्वश्रूत आहे.पुर्णा तालुक्यातील परिस्थिती हाताळण्या इतपत क्षमता असलेला एकही कर्तव्यकठोर अधिकारी तालुक्यात नसल्याचे सद्याच्या परिस्थितीवरून निदर्शनास येत असून तालुक्याला आता एखाद्या प्रशिक्षणार्थी आयपीएस उपविभागीय अधिकाऱ्याची आवश्यकता निर्माण झाली असून जिल्ह्याचे कर्तव्यकठोर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण उपाध्याय यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे...
0 टिप्पण्या