💥पुर्णा शहरातील मोकाट जनावरांना विविध आजारांची लागण,मानवी जिवण असुरक्षीत...!



💥न.पा.प्रशासन व आरोग्य यंत्रणा निद्रिस्त 'कोरोना' सारख्या भयंकर आजाराला निमंत्रण देण्याचा प्रकार💥

पुर्णा/शहरातील मानवी वसाहतींमध्ये वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना केसगळतीसह खाजेचा आजार तर गाढव डुकरांनांही अत्यंत भयंकर आजाराने ग्रासल्याचे दिसत असून यामुळे नागरिक वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हीं या मोकाट आजारी प्राण्यांपासून जिवघेणे आजार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.परंतु नगर परिषद प्रशासन व आरोग्य यंत्रनेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अश्या प्राण्यांपासून शहरात विविध संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
देशासह संपूर्ण राज्यात तसेच शहर गाव पातळीवर चिन देशातील 'कोरोना' या भयंकर संसर्गजन्य जिवघेण्या आजारामुळे नागरिकांमध्ये अगोदरच प्रचंड दहशत निर्माण झाली असतांना.जनावरांच्या मांस भक्षणापासून निर्माण झालेल्या या भयंकर जिवघेण्या 'कोरोना' आजारा आपल्यालाही जडला तर काय होणार ? या दहशतीखाली नागरिक वावरत असतांनाच शहरातील मानवी वसाहतींमध्ये वावरणारी मोकाट जनावरे ज्यात कुत्रे,मांजरी,गाढव,डुकर आदी प्राण्यांना विविध गंभीर आजार जडत असल्याने तसेच शहरातील विविध नागरी वसाहतींमध्ये होणारी उघड्यावरील पोलट्री-बॉयलर चिकन,बकरा,गाय,बैल,मच्छी आदी जनावरांची मांस विक्री 'कोरोना' सारख्या भयंकर आजाराला तर निमंत्रण देणार नाही ना ? असा गंभीर प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होऊन शहरातील नागरीक भयंकर दहशतीखाली वावरतांना दिसत आहे.
शहराती लोकमान्य टिळकरोड,डॉ.आंबेडकर रोड,बसस्थानक रोड,शास्त्री नगर,स्टेशनरोड,भिमनगर,आण्णाभाऊ साठे नगर,रेल्वे स्टेशन रोड,मस्तानपुरा,अली नगर,पंचशील नगर,सिध्दार्थ नगर,आंबेडकर नगर आदी भागांमध्ये बेकायदेशीर मांस विक्री करणारे मांस विक्रेते जनावर कापून त्यातील वेस्टेज उघड्यावर फेकत असल्याने त्यावर मोकाट कुत्रे तुटून पडत असून अश्या मोकाट कुत्र्यांना भयंकर संसर्गजन्य रोगांची लागन होत असून ही असंख्य मोकाट कुत्रे शहरातील नागरी वसाहतींमध्ये फिरून मानवी जिवणास धोका निर्माण करीत असून या आजाराची लागण लहान मुलांना आणी मोठ्या मानसांनाही होत असल्याचे निदर्शनास येत याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील विविध भागात डुकर आणी गाढव या प्राण्यांनाही भयंकर आजार जडल्याचे निदर्शनास येत असून या प्राण्यांचे विविध अंग अक्षरशः सडून झडतांना पाहावयास मिळत असून त्यातून वाहणाऱ्या रक्त आणी पुवामुळे अक्षरशः दुर्गंधी सुटत असल्यामुळे नागरिक त्रस्त होतांना दिसत आहेत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास याचे गंभीर परिणाम शहरातील नागरिकांना भोगावे लागणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांकडून मिळत आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या