💥पत्रकाराला मारहाण करणारा पोलीस अधिकारी अखेर निलंबित पत्रकार एकजूटीचा विजय...!💥नागपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय बोरसे यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश💥

मुंबई :पत्रकारांच्या एकजुटीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.. मिड डेचे वरिष्ठ छायाचित्रकार एका आंदोलनाचे छायांकन करीत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती.. मराठी पत्रकार परिषदेसह मुंबईतील व  पत्रकार संघटनांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.. तयानुसार नागपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय बोरसे यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे तर दुसरे अधिकारी शेख यांचा प्रोबेशन कालावधी वाढविणयाचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.. पत्रकार संघटनांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे..
"मिड डे" चे वरिष्ठ छायाचित्रकार  आशीष राजे यांच्यावर गुरूवार  दिनांक ६ फेब्रुवारी रोजी  पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आज गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्या  सोबत झालेल्या पत्रकार संघटनांच्या बैठकीत राजे   मारहाण  प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी बोरसे (एपीआय) यांची चौकशी होईपर्यंत निलंबित तर दुसरे पोलिस अधिकारी शेख (पीएस आय) यांचा प्रोबेशन कार्यकाळ वाढविला जाईल असा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.

राजकीय मोर्चे, आंदोलने किंवा कोणत्याही दुर्घटनेप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी सौजन्याने वागावे असे परिपत्रक  पोलीस आयुक्तांनी काढले आहे.त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधिक्षकांनी करावी अशा सुचना त्वरित दिल्या जातील.  तसेच साकीनाका आग प्रकरणी वाहतूक विभागाच्या  एसीपी अस्मिता भोसले व बांद्रा    मातोश्री येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्या    प्रकरणी खेरवाड़ी पोलिसांना योग्य ती समज दिली जाईल असाही निर्णय घेतला गेला.टी व्ही जर्नालिस्ट एसोसिएशन,मराठी पत्रकार परिषद,बाॅम्बे फोटोग्राफर असोसिएशन, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ,  या पत्रकार संघटनानी अधिकार्यांच्या निलंबनाची  मागणी लावून धरली ती गृहमंत्र्यांनी  मान्य कली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या